शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा राजगुरू फाउंडेशनेचे काम प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

राजगुरुनगर : हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी आहे. जगाच्या पाठीवर अनेक लोक इतरांना मदत करतात, अडचणीत सापडलेल्या माणसाला ...

राजगुरुनगर : हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी आहे. जगाच्या पाठीवर अनेक लोक इतरांना मदत करतात, अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत केली पाहिजे. मनुष्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून फाउंडेशन उल्लेखनीय काम करीत आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी राजगुरूनगर येथे केले.

हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन आयोजित हुतात्मा राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने हुतात्मा राजगुरू पुरस्कार वितरण सोहळा राजगुरुनगर येथे पार पडला. यावेळी मोहिते पाटील बोलत होते. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने रांगोळीकार महादेव गोपाळे, रियल लाईफ रियल पीपल्स संस्थेचे एम. ए. हुसेन, चित्रकार राजाराम होले, पेपर विक्रेता ढमाले यांना हुतात्मा राजगुरू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे यांना हुतात्मा राजगुरू सन्मानपत्र व राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये विक्रम नोंदविणारे वैष्णव ठाकूर, सारिका शिनगारे, संस्कृती गिलबिले, मेघना मुसळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

आमदार मोहिते पाटील म्हणाले, समाजातील अनेक गरीब लोकांना मदत करण्याची भावना निर्माण झाल्यानंतर हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनची कैलास दुधाळे यांनी स्थापना केली. त्यात देणाऱ्या व्यक्तींचा समावेश केल्याने अनेक गरजू, गरीब दुःखी आणि आपत्तीग्रस्त लोकांना फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. समाजात योगदान देणाऱ्या व्यक्तींची दखल फाउंडेशनने घेतली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा टाकळकर-पवळे, माजी सभापती अरुण चांभारे, विजया शिंदे, संपदा सांडभोर, अजित वाळुंज, बाळासाहेब सांडभोर, सचिन वाळुंज यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुरस्कार देण्यात आलेले महादेव गोपाळे, राजाराम होले एम. ए. शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी तर आभार उपाध्यक्ष बाळासाहेब सांडभोर यांनी मानले.

२५राजगुरुनगर

पेपर विक्रेता सुरेश ढमाले यांचा हुतात्मा राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते सन्मान केला.