शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

‘टाइम बजेट’साठी फ्लोअरवर जाऊन काम

By admin | Updated: April 2, 2016 03:24 IST

दुसऱ्यांदा मिळालेली संधी व गेल्या वर्षीचे बजेट पूर्ण करताना आलेले अनुभव पाहता जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले असून याचा प्रत्यय शुक्रवारी १ एप्रिल रोजी

पुणे : दुसऱ्यांदा मिळालेली संधी व गेल्या वर्षीचे बजेट पूर्ण करताना आलेले अनुभव पाहता जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले असून याचा प्रत्यय शुक्रवारी १ एप्रिल रोजी आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आला. त्यांनी आपल्या कक्षात बसण्याऐवजी सर्वच विभागांत जाऊन सभापतींच्या दालनात जाऊन ‘टाईम बजेटच्या कामाला सुरुवात केली.यासंदर्भात कंद यांना विचारले असता आपण यापुढे त्या त्या विभागाच्या फ्लोअरवर जाऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या त्या विभागात जाऊन सभापती, अधिकारी यांच्या दालनात त्यांच्या खुर्चीत बसून आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे हेही होते.सुरुवातीला समाजकल्याण विभागात जाऊन वाटप करण्यात येणाऱ्या पीठ गिरणींच्या नमुन्याची त्यांनी पाहणी केली. ते म्हणाले, ‘‘लाभार्थींना कोणतीही वस्तू देताना तिच्या दर्र्जात तडजोड सहन करणार नाही. त्यामुळे दाखवलेला नमुना व पुरवठा होणाऱ्या गिरणी त्याच दर्जाच्या आहेत का, हे पाहणे माझे काम आहे.’’ त्यानंतर समाजकल्याण, शिक्षण व बांधकाम विभागात जाऊन तेथील कामाचा आढावा घेतला. बजेटच्या सभेतच ५० लाखांपुढील योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचा ठराव घेतला आहे. त्याचा खातेनिहाय आढावा घेण्यासाठी शनिवारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैैठक घेण्यात येणार आहे. यात योजनांच्या अटी व शर्ती ठरवणे, प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतले जाणार आहेत. (प्रतिनिधी)टंचाई कक्षाची परीक्षा या भेटी दरम्यान अध्यक्ष यांनी पाणी पुरवठा विभागात जावून टंचाई कक्षाची परीक्षा घेतली. कक्षात जावून कोणाकडे काय काम आहे. त्याला त्या कामाची आजची स्थिती काय आहे? टँकर किती आहेत ? असे प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले. कक्षाचे प्रमुख यावेळी उपस्थित नव्हते. पुढील काळात गांभीर्य लक्षात घेवून काम करा अशा सूचना दिल्या. लोकमतने यापूर्वी टंचाई कक्ष नावापुरता असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या कक्षात नियमीत आढावा सुरू झाला आहे.