शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

विठ्ठलवाडीत ओढ्याचे काम रखडले

By admin | Updated: May 9, 2017 03:23 IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खोलीकरणाचा शुभारंभ केलेल्या ओढ्याचे काम रखडले. त्या वेळेपासून आत्तापर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खोलीकरणाचा शुभारंभ केलेल्या ओढ्याचे काम रखडले. त्या वेळेपासून आत्तापर्यंत ओढ्याचे काम अर्धवटच राहिले आहे. घरोघर पाण्याचा टँकर असणे हा सक्तीचा अलिखित नियम आहे की काय असे वाटावे, अशी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील विठ्ठलवाडी गावची परिस्थिती आहे.इंदापूर शहराच्या दक्षिणेला इंदापूर-अकलूज रस्त्यालगत अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर ही विठ्ठलवाडी आहे. गलांडवाडी नं. २ च्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ती मोडते. १२०० लोकसंख्येच्या या गावात सुमारे १५०० पाळीव जनावरे आहेत. उजनी पाणलोट क्षेत्र व विठ्ठलवाडी दरम्यानच्या परिसरातील जमिनीच्या उंचसखलतेमुळे विठ्ठलवाडीच्या भूगर्भातील पाणीसाठा हरवला आहे. तीनशे ते सहाशे फुटांपर्यंत खोलीवर देखील पाण्याचा थेंबही लागत नाही. केवळ मातीच बाहेर येते. त्यामुळे या गावात बोअर घ्यायला लोक धजावत नाहीत. तीन-चार वर्षांपूर्वी दोनशेच्या वर बोअर घेऊनही पाणी लागले नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. तरंगवाडी तलाव हाच या गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. तो गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरडाच होता. आजघडीला तो थोडाफार भरला असला तरी तरंगवाडी तलावावर अवलंबून असणाऱ्या इतर गावांच्या तुलनेत विठ्ठलवाडीला किती पाणी मिळणार हा प्रश्नच आहे. पाणी दोन-चार किलोमीटरहून आणावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते इंदापूर तालुक्यातील त्यांचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र नीरानृसिंह मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघाले असता त्याच रस्त्यावरील विठ्ठलवाडीच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याचे खोलीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ सकाळी सात वाजता त्यांच्या हस्ते झाला होता. रोटरी क्लबच्या माध्यमातून होत असलेल्या या कामाचे भूमिपूजन देवदर्शनाआधी थाटामाटात झाल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.