शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

गट-तट सोडून एकत्रितपणे काम करा : अजित पवार

By admin | Updated: April 27, 2015 04:54 IST

स्थानिक नेत्यांनी मनामध्ये असणारी अढी दूर करून, माझा मी आणि गटतट, हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्रिपणे काम करायला हवे

पिंपरी : स्थानिक नेत्यांनी मनामध्ये असणारी अढी दूर करून, माझा मी आणि गटतट, हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्रिपणे काम करायला हवे. माणूस मोठा नसतो, तर पक्ष मोठा असतो, ही भावना ठेवून काम करायला हवे. आपण विकास कामाचे मार्केटिंग करायला हवे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात निर्धार मेळावा घेण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आझम पानसरे होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शहराध्यक्ष योगेश बहल, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, शिक्षण मंडळाचे सभापती धनंजय भालेकर, सुरेखा लांडगे, मयूर कलाटे, रंगनाथ फुगे, संजोग वाघेरे, अनिता फरांदे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, हनुमंत गावडे आदी उपस्थित होते. सहा महिन्यांनंतर राज्यातील सेना-भाजपा सरकारमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. आम्ही विरोधात असलो, तरी विकासाच्या मुद्द्यावर कधीही राजकारण करणारे नाही.’’ महापालिकेत वारंवार होणाऱ्या सभा तहकुबीच्या मुद्द्यावर पवार म्हणाले, ‘‘वारंवार सर्वसाधारण सभा तहकूब करू नका. त्यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीवर परिणाम होतो.’’भास्कर जाधव म्हणाले, ‘‘सत्तेपेक्षा संघटनेला महत्त्व असते. आपण लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केवळ बोलून, उदोउदो करीत बसलो. उलट, विरोधी पक्षाने उणिवा शोधून टीका केली. आपणास साधे विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही, याचे आत्मचिंतन व्हायला हवे.’’पानसरे म्हणाले, ‘‘आपापसांतील भांडणामुळे एकमेकांच्या चुका काढण्याच्या वृत्तीमुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे.’’ या वेळी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे, बहुजन समाज पक्ष अशा विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच, शहरातील ज्येष्ठ नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. वाघेरे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याच्या आयोजनाची भूमिका सांगितली. विजय लोखंडे, फजल शेख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)