शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपमुळे मिळाला वाबळे घराण्याच्या इतिहासाला उजाळा

By admin | Updated: May 12, 2016 01:22 IST

मुढाळे (ता. बारामती) येथील तरुणांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून विविध भागांत विखुरलेल्या आपल्या वाबळे परिवारातील सदस्यांना रविवारी (दि. ८) शिवजयंतीदिनी एकत्र केले

वडगाव निंबाळकर : मुढाळे (ता. बारामती) येथील तरुणांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून विविध भागांत विखुरलेल्या आपल्या वाबळे परिवारातील सदस्यांना रविवारी (दि. ८) शिवजयंतीदिनी एकत्र केले. त्यांचा एकमेकांशी संवाद झाल्याने विविध भागांतून सुमारे पाचशे जण एकत्र आले. त्यामुळे पानिपतच्या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या सरदार जानराव वाबळे यांचा इतिहास त्यांच्या वारसांच्या पुढे आला. एकत्रित आलेल्या वाबळे घराण्यातील सदस्यांनी आपल्या घराण्याच्या इतिहासावर चर्चा केली. यातून पानिपतच्या युद्धात सरदार जानराव वाबळे यांनी तीन हजार सैन्याचे नेतृत्व केल्याचे ऐतिहासिक दाखले जाणकारांनी आपल्या भाषणातून सांगितले. यामुळे उपस्थितांना माहीत नसलेला आपल्या घराण्याचा इतिहास कळाला. येथील वाबळे घराण्यातील अक्षय, अजिंक्य, अनिकेत, अजान, सूरज, दत्तात्रय, मनोज यांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी सरदार वाबळे परिवार ग्रुप तयार केला. सदस्यसंख्या वाढत गेली. त्यामुळे तीन ग्रुपच्या माध्यमातून साडेसातशे जण एकमेकांच्या संपर्कात आले. आपण कार्यक्रम घेऊन आपल्या मूळ गावी मुढाळे येथे भेटू, असे ठरले आणि बघता बघता शिवजयंतीचे औचित्य साधून सर्व जण एकत्र आले. माळेगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या वेळी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे नगरसेवक संजय वाबळे, मनोहर वाबळे, हनुमंत वाबळे यांच्यासह वाबळे आडनावाचे साहेबराव, राजेश, विलास, मनसुब, बाळासोा, शामराव, रमेश प्रमुख सदस्य उपस्थित होते. संजय वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. वसंत वाबळे यांनी प्रास्ताविक केले. उषा वाबळे यांनी आभार मानले. मुढाळे येथील नागरिकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.