शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांना दणका : चौघांवर गुन्हे दाखल, तस्करांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 04:15 IST

पुणे व नगर परिसरात वाळूतस्करी करणाºयांना अखेर दणका बसला आहे. अवैध वाळूतस्करी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तीन पोकलेन, एक जेसीबी मशीन जप्त केले आहे.

- संजय बारहाते ।टाकळीहाजी : पुणे व नगर परिसरात वाळूतस्करी करणाºयांना अखेर दणका बसला आहे. अवैध वाळूतस्करी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तीन पोकलेन, एक जेसीबी मशीन जप्त केले आहे. एकूण ४८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी गणेश शिवराम पाचर्णे, मुकुंद शिवराम भुजबळ (रा. शिरूर) भालचंद्र जनार्दन फुलसुंदर, गणेश बाळू लंके (रा. निघोज ता. पारनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरूर तालुक्यातील टाकळीहाजीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पारनेर तालुक्यातील ढवणवाडी येथील कुकडी नदी व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी होत होती. वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हाधिकारी अभय महाजनयांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.या भागात सुरू असलेल्या वाळूतस्करीच्या संबंधात ‘लोकमत’ने वाचा फोडली होती.अनेक दिवसांपासून वाळूची तस्करी होत होती. टाकळीहाजी परिसरातील माळवाडी रस्त्याने हीच वाळू पुणे-मुंबईकडे जात होती. किमान तीन कोटींची वाळूतस्करी झाली असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे. या भागातील रस्ते नुकतेच चांगले करण्यात आले आहेत; मात्र या वाळूवाहतुकीने हे रस्ते खराब होत असल्याची तक्रार शिरूर तहसीदार यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती. मात्र, वाळवाहतूक करणाºयांवर या अधिकाºयांनी कोणतीही कारवाई केली नाही.अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, आनंद भोयटे व पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.बेसुमार उपशाने नदीपात्रात खड्डे...राजकीय हितसंबंध दाखवून अथवा वाळू उपसण्याचा नगर जिल्ह्याचा रीतसर परवाना घेतल्याची खोटी माहिती देऊन हे वाळूतस्करी करणारे ग्रामस्थांना धमकावीत होते. कुकडीच्या नदीपात्रात या वाळूतस्करांनी सात ते आठ पोकलेन व जेसीबीच्या माध्यमातून दररोज पन्नास ते साठ ट्रक वाळूउपसा करीत होते. त्यामुळे या नदीपात्रात २५ ते ५० फुटांचे खड्डे तयार झाले आहेत.‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश...अनेक दिवसांपासून या परिसरात वाळूतस्करी सुरू असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी पारनेरच्या तहसीदार भारती सागरे व नगरचे प्रांत गोविंद दाणेज यांना दिली होती. निघोज येथे झालेल्या ग्रामसभेत ढवणवाडी येथील वाळूतस्करी बंद करण्याचा ठराव व वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना या ठरावाच्या प्रती पाठवण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला होता. ‘लोकमत’ने ही वाळूतस्करी बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता .