शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला कुस्तीगीरांनी मिळविली ११ सुवर्ण

By admin | Updated: October 6, 2016 03:36 IST

पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत जोगमहाराज व्यायामशाळेच्या महिला कुस्तीगीरांनी तब्बल ११

शेलपिंपळगाव : पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत जोगमहाराज व्यायामशाळेच्या महिला कुस्तीगीरांनी तब्बल ११ सुवर्ण, तसेच प्रत्येकी १ रौप्य व कांस्यपदक मिळवून स्पर्धेतील यशाचा दबदबा कायम ठेवला आहे. आळंदीतील जोगमहाराज व्यायामशाळेच्या क्रीडा प्रांगणात पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक डी. डी. भोसले, उद्योजक सुधीर मुंगसे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सतरा वर्षांखालील वयोगटात ३८ किलो वजन गटातून स्नेहल वायदंडे, ४० किलो वजन गटात धनश्री फंड, ५२ किलो वजन गटात भाग्यश्री फंड, ६० किलो वजन गटात रमणदीप संधू, ६५ किलो वजन गटात तनुजा आल्हाट यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्णपदकाची कमाई केली. ४३ किलो वजन गटात राधिका चव्हाणने रौप्य व ७० किलो वजन गटात पूजा शिर्केने कांस्यपदक पटकाविले. तसेच १९ वर्षांखालील वयोगटात ४४ किलो वजन गटातून रूपाली अडसुरे, ४८ किलो वजन गटातून प्रतीक्षा मुंडे, ५१ किलो वजन गटातून कोमल देसाई, ५५ किलो वजन गटातून यशश्री खेडेकर, ५९ किलो वजन गटातून निकिता ढवळे व ६३ किलो वजन गटातून हर्षदा जाधव यांनी सुवर्णपदक पटकाविले. यशस्वी खेळाडूंना कुस्तीगीर परिषदेचे अधिकारी ललित लांडगे, शासकीय मार्गदर्शक शिवाजी कोळी, शिवसेना शहरप्रमुख आशा गायकवाड, नगरसेविका शकुंतला रानवडे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)