शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

महिला सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:51 IST

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला सुरक्षा समितीने महिला आणि मुलींसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असुरक्षित ५० ‘हॉट्स पॉइंट्स’ असल्याचा अहवाल दिला होता.

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला सुरक्षा समितीने महिला आणिमुलींसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असुरक्षित ५० ‘हॉट्स पॉइंट्स’ असल्याचा अहवाल दिला होता. या अहवालाकडे पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि महावितरण अशा सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष झाले असून, यंत्रणांच्या उदासीनतेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महिला छेडछाड, रोडरोमिओंचा सहन करावा लागणारा त्रास, पाठलाग, एकतर्फी प्रेमामधून होणारी छळवणूक अशा एक ना अनेक समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. त्यामधून होणाºया मानसिक त्रासामधून अनेक मुली आणि महिलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे ताजी आहेत. आजही शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, बसथांबे, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणांवर महिलांना ‘ईव्ह टिसिंग’चा सामना करावा लागतो. या छेडछाडीचा सामना कसा करायचा, पोलिसांची मदत कशी घ्यायची, यासोबतच स्वसंरक्षण कसे करावे यासाठी पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासमधील मुलींशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, हा संवाद काही दिवसच चालला.पोलिसांच्या दृष्टीने यातील ‘हॉट पॉइंट्स’वर विशेष लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी गस्त वाढवणे, गर्दीच्या वेळी, सकाळी आणि संध्याकाळी पोलिसांचा या भागात वावर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवस चाललेले पोलिसांचे हे सोपस्कार नंतर बंद पडले. जाता येता कधीतरी एखादी चक्कर मारली म्हणजे झाले, अशी भूमिका सध्या पोलिसांनी घेतल्याचे चित्र आहे. बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जनस्थळी जाणे जोडप्यांसाठी धोकादायक असून, कोणताही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते अशा ठिकाणांवर पोलिसांनी गस्त घालणे, त्यांना हटकणे आवश्यक आहे.संवेदनशील ठिंकाणांवर हवे लक्षशाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बागा, गल्लीबोळ, बाजार, क्लासेस, बसथांबे, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे रस्ते आणि खाऊ गल्ल्या आदी ठिकाणांची पाहणी केल्यानंतर महिला सुरक्षा समितीने काही निष्कर्ष काढले होते.संवेदनशील ठिकाणांची यादी चारही परिमंडलांच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आली होती. या यादीमध्ये यापूर्वी महिला छेडछाड अथवा गैरप्रकार घडलेल्या ठिकाणांचाही समावेश करण्यात आला होता.काय होती महत्त्वाची कामे?1 ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाश व्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे.2 सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दारे खिडक्या व्यवस्थित असणे, तसेच तेथेही प्रकाशव्यवस्था चोख असणे अशी कामे मुख्यत्वे करून पालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून एकत्रितपणे करणे3 पालिकेची स्वच्छतागृहे, पथदिवे, भुयारी मार्ग, रात्रीच्या वेळी बागांमधली सुरक्षा आणि प्रकाश व्यवस्था पोलिसांनी तपासणे. बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जनस्थळी जाणे धोकादायक, त्यांना हटकणे.महापालिका आणि महावितरणच्या मदतीने ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाश व्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दारे-खिडक्या व्यवस्थित असणे, तसेच तेथेही प्रकाशव्यवस्था चोख असणे अशी कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यासाठी महिला सुरक्षा समितीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पोलीस अधिकाºयांसह महापालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांचा बोजवारा उडाला आहे. या समितीची दर महिन्याला बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र, या बैठकाच बंद पडल्या आहेत. ही समितीही विखुरली असून याबाबत ना कोणाला गांभीर्य आहे ना खंत.उपाययोजनेकडे दुर्लक्ष!या समितीमार्फत शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, निर्जन स्थळे, बागा या ठिकाणी असणाºया सुरक्षेची नियमित पाहणी करण्यात येत होती. या ठिकाणी असणाºया विजेची उपलब्धता, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे यांची उपलब्धता पाहून त्यावर वेळोवेळी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. शहरातील महिलांसाठी सुरक्षित नसलेल्या ठिकाणांचीही पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे तसेच शहरातील रस्त्यांवरील, इतर सर्व ठिकाणचे वातावरण सुरक्षित व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निकष पाळले जात नाहीत.महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभागातील अधिकाºयांची संयुक्त महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार, ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या दर महिन्याला बैठका होत होत्या. शहरातील विविध रस्ते, स्वच्छतागृहे, बसथांबे आदी ठिकाणांची पाहणी करून तेथे संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कामे केली जात होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून या समितीच्या बैठका बंद पडल्या आहेत.ही होती ‘ती’ संवेदनशील ठिकाणेजिजामाता महाविद्यालय, शुक्रवार पेठआरसीएम गुजराथी हायस्कूलएसीसी क्लासेस, कसबा पेठएस. पी. महाविद्यालयभारत इंग्लिश स्कूलफर्ग्युसन महाविद्यालयएसएनडीटी कॉलेजआपटे हायस्कूलएमआयटी कॉलेज परिसरस्वानंद रोड ते कर्वे चौक बसथांबाकमिन्स कॉलेज ते कर्वे चौकआझम कॅम्पसएम. जी. रस्तापुणे स्टेशन परिसरदस्तूर मेहेर हायस्कूलएस. व्ही. युनियन हायस्कूलसारसबागमुक्तांगण शाळाअरण्येश्वरशाहू कॉलेजभारती विद्यापीठ कॅम्पस व आजूबाजूचा परिसरबिबवेवाडी कॉर्नरमहेश सोसायटीआनंदनगरसिम्बायोसिस कॉलेजहिंजवडीशिवार गार्डन काळेवाडीनृसिंह हायस्कूल, सांगवीकृष्णा बाजार चौक, नवी सांगवीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठडी. ए. व्ही. स्कूल औंधसूस खिंड टेकडीडी. वाय. पाटील महाविद्यालय संत तुकारामनगरशगुन चौक पिंपरीभक्तिशक्ती चौक निगडीफत्तेचंद जैन हायस्कूल चिंचवडपीएमटी बसथांबा चौक चिंचवडशाहूनगरस्वामी विवेकानंदनगर दापोडीपीएमटी चौक भोसरीखडकी बाजारआलेगावकर शाळाभैरवनगरगायकवाडनगर व ज्युनिअर कॉलेज परिसरमोझे शाळाएमआयटी कॉलेज देहूफाटागेनबा मोझे शाळानेताजी हायस्कूल प्रतीकनगरसिम्बायोसिस कॉलेज परिसरफिनिक्स मॉल परिसरदेसरडा क्लासेसआनंदबागसुंदरबाई मराठी शाळातुकाराम पठारे विद्यालयचंदननगर