शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचारांत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 02:05 IST

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत दोन वर्षांत बलात्काराच्या १५६ घटना घडल्या असून, यामध्ये बहुतांश घटना या लग्नाचे आमिष दाखवून घडल्या आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत दोन वर्षांत बलात्काराच्या १५६ घटना घडल्या असून, यामध्ये बहुतांश घटना या लग्नाचे आमिष दाखवून घडल्या आहेत. तसेच विनयभंगाच्या ३८७ घटना घडल्या. प्रत्येक महिन्याला पोलीस परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये बलात्कार, विनयभंगाच्या घटनांच्या नोंदी होत आहेत. युवतीला प्रेमाच्या जाळ््यात ओढून, त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणे आणि नंतर लग्नास नकार देणे, अशा प्रकारे फसवणुकीतील बलात्काराच्या घटनांच्याच सर्वाधिक नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत. परिमंडळ तीन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:श्रृंगी, हिंजवडी, सांगवी, आणि वाकड या ठिकाणी २०१४ मध्ये बलात्काराच्या ५४ घटना घडल्या. तर विनयभंगाच्या १३५ घटना घडल्या. तर २०१५ मध्ये हे प्रमाण दुप्पट वाढून बलात्काराच्या १०२, तर विनयभंगाच्या २५२ घटना घडल्या. २०१४ मध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना पिंपरी, निगडी, हिंजवडी येथे घडल्या. तर गेल्या वर्षी पिंपरी, निगडी, वाकड या ठिकाणी घडल्या. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात बलात्काराच्या मोठ्या घटना उघडकीस आल्याने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी एका पीडितेची तक्रार चौकीतल्या पोलीस कर्मचाऱ्याने नोंदवून न घेतल्यामुळे पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होती. त्या वेळी रिक्षावाल्याने तिला गाठून पोलीस ठाण्यात घेऊन न जाता अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार केला होता. मागील महिन्यात हिंजवडी येथील एका कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर तेथील दोन कामगारांनीच महिलेला वॉशरुम मध्ये नेऊन बलात्कार केला होता.भोसरीत युवतीला लग्नाचे आमिष दाखविले. घरी आई-वडिलांशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने घरी न नेता मारहाण करुन अत्याचार केला.(प्रतिनिधी)अल्पवयींन मुलीही वासनेचा बळी ४नराधमांच्या वासनेतून अल्पवयीन मुलीही शिकार होत असून, गेल्या महिनाभरात अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस आल्या. यामध्ये चिंचवड येथे 22 जानेवारीला एका १४ वर्षीय अल्पवयीन युवतींवर दोन नराधमांनी गोडी-गुलाबीने दुसरीकडे नेऊन अत्याचार केला. तसेच २६ जानेवारीला आई घरात नसल्याचा फायदा घेत शेजारीच राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाने ४ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तर चार दिवसांपूर्वीच पिंपरी येथे घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन युवतींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. तर दोन वर्षांत ४० विवाहितांच्या आत्महत्या ४लग्नानंतर माहेरुन घर घेण्यासाठी,वाहन घेण्यासाठी तसेच इतर कारणावरून सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गेल्या दोनवर्षांत पिंपरी-चिंचवडमधील ४० नवविवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये २०१४ मध्ये २६ तर गेल्यावर्षी १४ विवाहितांनी आत्महत्या केल्या. दरम्यान मागील जानेवारी महिन्यातच चिखली येथे हुंड्यांच्या कारणावरून एका २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. तसेच चिंचवड येथे सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने तर सांगवीत एका २७ वर्षीय महिलेने पतीच्या होणाऱ्या वारंवार छळाला कंटाळून आत्महत्या केली.आई-वडिलांनी आपल्या मुलींशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. ती शाळेत केव्हा जाते-केव्हा येते. तिचे कोण मित्र-मैैत्रीण आहेत, याची चौकशी केली पाहिजे. प्रेमप्रकरणाची सांशियकता जाणवल्यास तिला समजुतीने या गोष्टींपासून दूर राहण्याचे सांगितले पाहिजे. तिला त्या मागील परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे. तसेच युवतीनीही मुलांवर विश्वास न ठेवता, त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. - रत्नमाला सावंत, पोलीस निरीक्षक, पिंपरी