शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चाकण नगर परिषदेवर महिलांचा मोर्चा

By admin | Updated: April 29, 2017 03:56 IST

महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टी परिसर ‘हगणदरीमुक्त’ करण्यासाठी चाकण नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेली फिरती शौचालये

आसखेड : महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टी परिसर ‘हगणदरीमुक्त’ करण्यासाठी चाकण नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेली फिरती शौचालये बुधवारी (दि. २५) बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर मोर्चा आणून संबंधित फिरती शौचालये परत सुरू करावीत, अशी मागणी केली. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. चाकणमधील महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टीत सुमारे २४४ कुटुंबे राहतात. संबंधित झोपडपट्टी नियमित नसल्याच्या कारणास्तव येथे गेल्या अनेक वर्षांत ग्रामपंचायत कार्यकाळात काहीही मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या. नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर या भागातील एका सदस्याला नगर परिषदेच्या कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळाले. त्यानंतर येथील शौचालयांची प्रमुख मागणी पुढे आल्यानंतर नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने मागील वर्षभरापासून येथे सुरुवातीला ४० व नंतर सुमारे ३० फिरती शौचालये कायमस्वरूपी उपलब्ध करून दिली होती. संबंधित फिरत्या ३० शौचालयांचा महिन्याचा खर्च तीन लाख रुपयांहून अधिक असल्याने तो नगर परिषदेला डोईजड झालाहोता. अखेरीस महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टी परिसराचे सर्वेक्षण करून सुमारे ५० कुटुंबांना मागील महिन्यात पक्क्या शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. प्रत्यक्षात संबंधित कुटुंबीयांनी अद्याप शौचालये बांधलीच नाहीत. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने बुधवारी फिरती शौचालये बंद करण्याचा निर्णय घेतला. यास संबंधित भागाच्या नगरसेविका सुरेखा गालफाडे, महेंद्र गालफाडे, आरपीआयच्या महिला आघाडीच्या सुनंदा बनसोडे यांच्यासह नागरिकांनी कडाडून विरोध करीत नगर परिषदेवर मोर्चा आणला. आमच्या भागातील फिरती शौचालये बंद करू नका, पाणी व अन्य समस्या तातडीने सोडवा, अशा मागण्या या वेळी केल्या. नगरसेवक सुदाम (भाऊ) शेवकरी, प्रकाश भुजबळ, जहीर शेख यांनीही संबंधित शौचालये सुरूच ठेवण्याची मागणी मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे केली. याबाबतची निवेदने मुख्याधिकारी साबळे यांना देण्यात आली. (वार्ताहर)