शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

स्वच्छतागृहांमुळे महिलांना दिलासा

By admin | Updated: December 24, 2015 00:55 IST

महिला, तरुणी खरेदीसाठी बाहेर पडल्या, की किमान अर्धा दिवस तरी खर्च होतो. आजूबाजूला स्वच्छतागृहांची सोय असेल तर दिलासा मिळतो. शहरातील काही बाजारपेठांमध्ये त्यांची कुचंबणा होत

पुणे : महिला, तरुणी खरेदीसाठी बाहेर पडल्या, की किमान अर्धा दिवस तरी खर्च होतो. आजूबाजूला स्वच्छतागृहांची सोय असेल तर दिलासा मिळतो. शहरातील काही बाजारपेठांमध्ये त्यांची कुचंबणा होत असली तरी बहुतांश ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. महिला खरेदीच्याबाबतीत अत्यंत चोखंदळ, चौकस असतात. त्यामुळे लहान-मोठ्या कोणत्याही वस्तूंची खरेदी करताना घासाघीस करणे, दर्जा तपासून पाहणे यामध्ये त्यांचा बराच वेळ जातो. भरपूर खरेदी करायची असल्याने कधी चार-पाच तास, तर कधी पूर्ण दिवस बाहेर जातो. अशा वेळी स्वच्छतागृहांमध्ये जाणे अपरिहार्य असते. बाजारपेठा, शॉपिंग मॉलच्या परिसरात स्वच्छतागृहांची सोय असेल तर महिलांची कुचंबणा होत नाही. मात्र, अशी व्यवस्था नसेल तर मात्र त्यांना घरी जाईपर्यंत संयम राखण्याशिवाय पर्याय नसतो. तुळशीबाग तुळशीबागेत फेरफटका मारला असता दिवसभर अमाप गर्दी पाहायला मिळते. महिलांसाठी येथे स्वच्छतागृह आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दुकाने सुरू असेपर्यंत हे स्वच्छतागृह खुले असते. महिला आणि पुरुषांकडून तीन रुपये शुल्क आकारले जाते. येथे चोवीस तास पाण्याची सोय आहे. तसेच, दररोज साफसफाई केली जाते. त्यामुळे येथे जाणे सोयीचे होते, असे मत महिलांनी व्यक्त केले. तुळशीबागेतून बाहेर पडल्यावर विश्रामबाग वाड्याच्या बाजूला महापालिकेचे स्वच्छतागृह आहे. बसथांब्यावरील महिलांना ते उपयुक्त ठरते. बिझी लँड कॉम्प्लेक्स कुमठेकर रस्त्यावरील बिझी लँड कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यावर कपड्यांची दुकाने आहेत. वरील मजल्यांवर टेलरची दुकाने आहेत. दररोज बऱ्याच महिला व तरुणी खरेदीसाठी, ड्रेस शिवायला देण्यासाठी येथे येतात. तसेच, येथील अनेक दुकानांमध्ये महिला कर्मचारी दिवसभर राबत असतात. त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक मजल्यावर एक स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या स्वच्छतागृहांची दररोज स्वच्छता ठेवली जाते. तसेच, खरेदीसाठी आलेल्या महिलांना स्वच्छतागृह नेटकेपणे वापरण्याच्या सूचना दिल्या जातात.क्लोव्हर सेंटर, कॅम्पकँप भागातील क्लोव्हर सेंटरमध्येही वरच्या मजल्यावर स्वच्छतागृहाची सोय आहे. मात्र, खरेदीसाठी बाहेरून आलेल्या महिलांना या स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी तेथील महिला कर्मचाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. येथील स्वच्छतेबाबत मात्र अनेक महिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दररोज स्वच्छता केली जात असल्याचीही काही महिलांनी तक्रार केली. अस्वच्छतेचा त्रास होऊ नये, यासाठी अनेक जण समोरच असलेल्या एसजीएस मॉलमध्ये फेरफटका मारायला जातात. तेथील स्वच्छतागृहाचा वापर करतात.हाँगकाँग लेनफर्ग्युसन रस्त्यावरील हाँगकाँग लेनमध्ये सर्व नव्या ट्रेंडच्या वस्तू, अ‍ॅक्सेसरीज, कपडे उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, जागेअभावी या ठिकाणी स्वच्छतागृहाची कोणतीही सोय नाही. येथील ग्राहक, दुकानदार आर डेक्कन मॉलमध्ये जाऊन, तर कधी डेक्कन जिमखान्यावरील स्वच्छतागृहाचा वापर करतात. दर वेळी मॉलमध्ये जाणे शक्य नसल्याने बसस्थानकाच्या स्वच्छतागृहामध्ये जावे लागते. मॉल येथे स्वच्छतेच्या नावाने ठणठणाट असल्याचे मत दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.