शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम सभापतीवर महिलांचा दावा

By admin | Updated: March 22, 2017 03:03 IST

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरुषांपेक्षा अधिक संख्या असतानादेखील अध्यक्ष, उपाध्यक्षपदी महिलांना संधी देण्यात आली नाही.

पुणे : जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरुषांपेक्षा अधिक संख्या असतानादेखील अध्यक्ष, उपाध्यक्षपदी महिलांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे महिलांचा सन्मान राखण्यासाठी व त्यांना खऱ्या अर्थाने राजकारणात सक्षम करण्यासाठी बांधकाम सभापती पदासह तीन सभापतिपद महिलांना देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित महिला सदस्यांनी केली आहे.महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांच्या पुढाकारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक प्रमाण महिलांचे आहे. परंतु अद्यापही आरक्षण असेल तरच अध्यक्षपदाची माळ महिलांच्या गळ््यात पडते. आजही अनेक महत्त्वाच्या पदापासून महिलांना वंचितच ठेवले जाते. परंतु आता महिलांना आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली असून, किमान महत्वांच्या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ७५ जागांपैकी ४४ जागांवर राष्ट्रवादी काँगे्रसचे सदस्य निवडून आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँगे्रसची एक हाती सत्ता आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या पुरुष सदस्यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीच्या ४४ सदस्यांपैकी महिलांची संख्या तब्बल २५ इतकी आहे. असे असताना देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी इच्छुक असून देखील महिलांचा विचार झाला नाही. त्यामुळे आता अध्यक्ष पदानंतर महत्वाचे असणारे बांधकाम सभापती पद महिलांना देण्याची मागणी आता पर्यंत तीन वेळा निवडून आलेल्या वरिष्ठ महिला सदस्या वैशाली पाटील, सुनिता गावडे, राणी शेळके,सुजाता पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँगे्रसच्या सर्व महिला सदस्यांनी केली आहे. बांधकाम सभापती पदासह समाजकल्याण आणि कृषी सभापती पदासाठी देखील महिलांचा विचार करण्याची मागणी महिलांनी केली आहे. त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी व महिलांची सभागृहातील संख्या विचारात घेऊन पक्षाने बांधकाम सभापती पद व अन्य दोन सभापती पद महिलांना देण्याची मागणी महिला सदस्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)