शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणात महिला न्यायाधीशांना लाचलुचपतने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : न्यायाधीशाला मॅनेज करून तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायाधीशाला मॅनेज करून तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केली.

अर्चना दीपक जतकर (रा. मावळ) असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. न्यायालयाने जतकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणात यापूर्वीच निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव याला अटक केली आहे़ तर, लाच घेताना जानेवारीमध्ये खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) हिला लाचलुचपत प्रबिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अर्चना जतकर यांना अटक करण्यात आली आहे.

अर्चना जतकर-शुभावरी गायकवाड यांच्यात तब्बल १४७ वेळा संपर्क करुन संभाषण केले आहे. गायकवाड यांनी फिर्यादी यांच्याविरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजूने काम करून देते असे म्हणाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे सभाषण व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. गायकवाड हिने फिर्यादीप्रमाणेच आणखी ७ ते ८ जणांना जागेच्या वादासंदर्भात कोर्टातून निकाल लावून देते असे म्हणून संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जमिनीच्या संदर्भातील वाद जतकर यांच्या कोर्टामध्येच सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

न्यायाधीश जतकर यांनी आरोपीसोबत संपर्क साधण्यासाठी वापरलेले सीमकार्ड हे मुंबईतील समता कुबडे यांच्या नावावर आहे. त्यांनी जतकर यांना दोन सीमकार्ड दिले आहेत. दुसरे सीमकार्ड जतकर यांनी कोणाला दिले याचा तपास करायचा आहे.

जतकर यांनी गुन्ह्यातील इतर आरोपी भानुदास जाधव याला एकूण १८ कॉल केले असून सुशांत केंजळे याला ४ कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. जतकर व इतर आरोपी यांनी यापूर्वी कट रचून आणखी काही गुन्हे केले आहेत काय याचा तपास करायचे असल्याचे सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ६ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सहायक पोलीस आयुक्त सिमा मेहेंदळे अधिक तपास करीत आहेत.

अदृश्य नेटवर्क शोधणे आवश्यक

अर्चना जतकर यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणात अदृश्य नेटवर्क आहे, ते शोधणे आवश्यक आहे, असे मत नोंदवले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार अर्चना जतकर या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज सकाळी शरण आल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.