शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महिलाही ठरताहेत सुसाट वेगाच्या बळी

By admin | Updated: April 22, 2016 01:33 IST

शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या शेकडो अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये महिला आणि विशेषत: तरुणींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे

पुणे : शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या शेकडो अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये महिला आणि विशेषत: तरुणींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात सिंहगड रस्त्यावर झालेल्या तरुणीच्या अपघातामुळे महिलांच्याही बेदरकार ‘ड्रायव्हिंग’चा मुद्दा चर्चेमध्ये आला आहे. गाडीचा बेफाम सोडलेला अ‍ॅक्सिलेटर, वेगाची प्रचंड नशा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे पुण्यातील रस्त्यांवर महिला आणि तरुणींनाही प्राण गमवावे लागत आहेत. उपनगरातीलच नव्हे, तर शहराच्या मध्यवस्तीतही भरधाव जाणारी वाहने म्हणजे चालतीबोलती ‘किलिंग’ मशिन ठरत आहेत. पुण्यातील रस्त्यांवर गेल्या अडीच वर्षांत १५२ महिलांना प्राण गमवावे लागले आहेत.वाहनचालकांमधील बेदरकार वृत्ती आणि वेगाची नशा या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. हीच नशा तरुणींमध्येही पाहायला मिळत आहे. महाविद्यालयांचा परिसर, बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवरून ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या तरुणी हमखास नजरेस पडतात. दुचाकीवर स्टंटबाजी करणेही अनेक तरुणींना महागात पडल्याचे पोलीस सांगतात.रस्त्यांवरून गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि रुग्ण नागरिक जात असतात. शाळकरी मुले, पादचारी यांचीही रस्त्यांवर वर्दळ असते. वाहनांपेक्षा रस्त्यांवर पहिला हक्क पायी जाणाऱ्याचा असतो. तो कायम असायला हवाच; परंतु बेदरकार वाहनचालक स्वत:च्या धुंदीत बेफाम जातात. तरुण वाहनचालकांकडून सर्रास होणारे वेगमर्यादेचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झाली. वाहनचालकांचे आणि शिस्तीचे एकमेकांशी दूरदूरूनही नाते नाही की काय, अशीच परिस्थिती सध्या दिसते आहे. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे, नो एंट्रीत वाहने चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर न करणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे असे नियमभंग करतानाही महिला आढळून येतात. वाहनांचा उरात धडकी भरविणारा वेग अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे. अनेक अपघातांत दोष नसताना घरातील कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. वाहन चालवताना संयम दाखविल्यास अपघात कमी होऊन होणारी जीवितहानी टळेल.