शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुस-यांना श्रेय देते ती स्त्री

By admin | Updated: December 22, 2014 05:22 IST

भारतीय स्त्री ही उदात्त विचारांची आहे. कुटुंबावर कितीही दु:खे आली तरी ते पेलत प्रत्येक स्त्री आपल्या मुलांना, कुटुंबाला घडवते आणि त्याचा तिला गर्व नसतो

पुणे : भारतीय स्त्री ही उदात्त विचारांची आहे. कुटुंबावर कितीही दु:खे आली तरी ते पेलत प्रत्येक स्त्री आपल्या मुलांना, कुटुंबाला घडवते आणि त्याचा तिला गर्व नसतो. मुले-कुटुंब यशाच्या शिखरावर गेली, की मी काही नाही केले, असे भाबडेपणाने सांगते. दुसऱ्यांना श्रेय देते ती खरी स्त्री असते, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.इंदुमती बनसीलाल संचेती यांच्या स्मरणार्थ संचेती ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार चेनसुख संचेती, माधुरी मिसाळ, नगरसेवक अ‍ॅड. अभय छाजेड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, अखिल भारतीय श्वेतांबर जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा रेणू जैन, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, विजय भंडारी, कांतिलाल जैन, वालचंद खरवड, विमल बाफना, प्रमिला सांकला, संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कंचनबाई बुरड व जयाबाई नहार यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ सत्यनारायण म्हणाल्या, आजच्या काळात काम करणाऱ्या महिलांचा बोलबाला आहे. पण ज्या महिला घरी राहून कुटुंब उभे करतात, पिढ्या घडवितात त्यांच्याकडेही लक्ष द्यायला हवे, अशा स्त्रियांचा सन्मान होणे गरजेचे आहे.चेनसुख संचेती म्हणाले, आईच्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही. आईचे प्रेम, वडिलांचा सल्ला आणि भावंडांची काळजी या तिन्ही गोष्टींवर लक्ष देणारे कुटुंब सुदृढ बनते. मिसाळ म्हणाल्या, मुलांच्या जडणघडणीत वडिलांचाही हातभार असतो. त्यामुळे त्यांचाही सन्मान व्हायला हवा. अभय छाजेड म्हणाले, थोर व्यक्तींच्या नावे दिले जाणारे पुरस्कार समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतात. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. या वेळी संजय चोरडिया, शैलेश बाफना, पन्नालाल लुनावत आदींचा सत्कार करण्यात आला.