शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्याची महिला सरपंचास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

उंडवडी कडेपठार : गोजूबावी येथील महिला सरपंचासह ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, ग्रामसेवकास ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार ...

उंडवडी कडेपठार : गोजूबावी येथील महिला सरपंचासह ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, ग्रामसेवकास ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (दि. १९) घडला. याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर अ‍ॅट्रॅसिटी, विनयभंग, शासकीय कामात अडथळा आदी कलमांतर्गत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरपंच माधुरी भगवान कदम यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कल्याण दामोदर आटोळे (रा. गोजूबावी, ता. बारामती) या सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोजूबावी ग्रामपंचायतीत सोमवारी मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीपूर्वीच कल्याण आटाेळे हे तेथे आले. त्यांनी मागील महिन्यात झालेल्या खर्चाचे हिशोब मागितला. या वेळी ग्रामसेवक सतीश बाेरावके यांनी बैठक सुरू होऊ द्या, त्यावेळी हिशोब दाखवतो असे सांगितले. मात्र, आटोळे यांनी आताच हिशोब द्या, अशी भूमिका घेतली. तसेच अरेरावी करत ग्रामसेवकांना शिवीगाळ केली. संगणक परिचालक सचिन मगन गावडे यांनी आटोळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, गावडे यांना मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर ग्रामसेवक बोरावके व संगणक परिचालक गावडे गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी बारामती येथे गेले. दरम्यान, आटोळे यांनी सरपंच माधुरी कदम यांचा हात पिरगळून, तुझी लायकी नाही सरपंच होण्याची, असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकारानंतर सरपंच माधुरी कदम, ग्रामसेवक सतीश बोरावके, संगणक परिचालक सचिन गावडे व कर्मचाऱ्यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत.

सहा महिन्यांतून पहिल्यादाच हे सदस्य मासिक बैठकीला आले होते. संबंंधित ग्रामपंचायत सदस्य वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे सदस्य निलंबित करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना प्रस्ताव देणार आहोत.

- माधुरी कदम, सरपंच, गोजूबावी