शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

By admin | Updated: January 12, 2016 03:58 IST

बिबट्याचे हल्ले पुन्हा सुरू झाल्याने जुन्नरच्या पूर्व भागात पुन्हा दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका महिलेवर

बेल्हा : बिबट्याचे हल्ले पुन्हा सुरू झाल्याने जुन्नरच्या पूर्व भागात पुन्हा दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात ही महिला जागीच ठार झाली. कल्पना भाऊ गुंजाळ (वय ३२, रा. रानमळा, ता. जुन्नर) असे मृत महिलेचे नाव आहे. ती रानमळा (ता. जुन्नर) येथील मदगुलेमळा शिवारात कांद्याच्या पिकाच्या शेतात आंतरमशागतीचे काम करीत होती. सायंकाळी ४.३०च्या सुमारास कांद्याच्या शेताकडूनच लपत एका बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून येऊन हल्ला केला. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या व ओरडल्या. बिबट्याने त्यांना १०० फुटांपर्यंत ओढत फरफटत नेले. या घटनेत कल्पना यांना गंभीर जखमा झाल्या. रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.येथून जवळच असणाऱ्या संभाजी वाघमारे या व्यक्तीने त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे फटाके वाजविले. या आवाजामुळे त्या बिबट्याने जवळच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. वन विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. आळेफाटा पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी त्वरित भेट दिली. मात्र, वन खात्याचे कर्मचारी उशिरा आले. (वार्ताहर)पिंजरा लावणारपूर्व भागात बिबट्याचे हल्लासत्र पुन्हा सुरू झाल्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पिंजरा लावण्याची मागणी या ठिकाणी असलेल्या संतप्त नागरिकांनी केली. वन खात्याने आश्वासन दिल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.