शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

By admin | Updated: November 18, 2014 03:23 IST

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील पांगरीतर्फे मढ गावाच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी झाडीत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला आहे

मढ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील पांगरीतर्फे मढ गावाच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी झाडीत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सदर महिला ठार झाल्याचा प्राथमिक आंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सखुबाई दादाभाऊ वारे (३३, ओतूर तेलदरा) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की सखुबाई वारे या बहिणीच्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी रविवारी भेंडेवाडी परिसरात गेल्या होत्या. तिथून परत येताना त्यांनी बहिणीच्या मुलाला, ‘तू पुढे जा, मी मधल्या (जंगल वाट) मार्गाने घरी कोळवाडीला जाते’ असे सांगितले. त्या पांगरी येथून पायी गेल्या. बहिणीचा मुलगा घरी आल्यानंतर सखुबाई न दिसल्याने नातेवाईक व इतरांनी डोंगर रस्त्यावर त्यांचा शोधा घेतला; परंतु त्या सापडल्या नाहीत. नतंर पाऊस व अंधार झाल्यामुळे रात्रीचा शोध थांबवून आज सकाळी परत शोधाशोध केली. या वेळी कवटधरी मंदिरामागील ओढ्यात त्यांचे कपडे व तिथेच वरील बाजूस अर्धवट खाल्लेला त्यांचा मृतदेह दिसला. मृतदेह पाहिल्यावर बिबट्यानेच त्यांना ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. पाऊलवाटेच्या कडेला त्यांच्या बांगड्या फुटलेल्या व ओढ्यात ओढत नेल्याच्या खुणा होत्या. ठिकठिकाणी रक्ताचे डाग व बिबट्याच्या पायांचे ठसे अंधुक दिसत होते. मृतदेह वाटेपासून ओढ्याच्य दुसऱ्या बाजूला झाडीत ओढत नेला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.सदर ठिकाणी ओतूर वनविभागाचे रेंजर एस.एस. रगतवान, वनरक्षक एम.एन. खताळ व रवींद्र्र गवादे यांनी पाहणी केली. ओतूर पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. याबाबत महिलेच्या मृत्यूची नोंद केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.खंडू रामभाऊ दिघे, बाळासाहेब सुकाळे, शैलेंद्र गायकवाड यांनी वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)