शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महिला आयकॉन्सना अक्षर सलाम

By admin | Updated: March 20, 2016 04:43 IST

एका प्रतिष्ठित महिलेने विविध क्षेत्रांत आपले भरीव योगदान केलेल्या महिलांचा केलेला सन्मान... इतर महिलांनी त्यांना दिलेली दाद...

पुणे : एका प्रतिष्ठित महिलेने विविध क्षेत्रांत आपले भरीव योगदान केलेल्या महिलांचा केलेला सन्मान... इतर महिलांनी त्यांना दिलेली दाद... आणि एकूणच स्त्री ही शक्ती नाही तर शक्ती ही स्त्री आहे, याचा उपस्थितांना आलेला प्रत्यय... असे वातावरण आज ‘लोकमत’च्या आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन) या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात होते. ‘लोकमत’च्या वतीने या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन खासदार जया बच्चन यांच्या हस्ते झाले. या वेळी लोकमत मीडिया प्रा. लि.चे अध्यक्ष खासदार विजय दर्डा, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, अमर साबळे, प्रसिद्ध लेखिका शोभा डे, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, अनिल काटे एंटरप्रायझेसचे संचालक अनिल काटे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा हे व्यासपीठावर उपस्थित होते.कोणी डॉक्टर, उद्योजिका, कोणी इंटेरिअर डिझायनर, बांधकाम व्यावसायिक आणि यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने स्वत:चे स्थान सिद्ध केलेल्या महिलांचा यानिमित्ताने ‘लोकमत’ने विशेष सन्मान केला. समाजनिर्मितीसाठी काम करणाऱ्या या महिलांचा वाटा महनीय आहे. फक्त शब्दांतून त्यांचा सन्मान न करता कृतीतून करणे अधिक सयुक्तिक वाटते आणि म्हणूनच आयकॉन्सचा सोहळा आयोजित केला आहे, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली.उषा काकडे म्हणाल्या, ‘‘महिलांनी जिद्द व कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात नाव उंचावू शकतात. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. त्यामुळेच आपण घराबाहेर पडून असा मुक्त संवाद साधत आहोत. यानिमित्ताने आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्याचबरोबर, स्व. वीणा दर्डा आणि स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून महिलांसाठी व्यासपीठ मिळवून दिले; त्यामुळे ‘लोकमत’चे विशेष आभार मानायला हवेत.’’स्त्री घराबाहेर पडली आणि ती मल्टिटास्किंग झाली; मात्र पुरुषांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या, तरी पुरुषांकडून अद्यापही त्याचा स्वीकार झालेला दिसत नाही. हे चित्र बदलण्यासाठी समाजाची, पुरुषांची मानसिकता बदलायला हवी. यासाठी शाळांमधूनच मुलांना याचे शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी सर्व खासदारांनी एकत्र येण्याची गरज आहे.- वंदना चव्हाण, खासदार