शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जोडप्यास मदत करणाऱ्या महिलेला मारहाण

By admin | Updated: November 7, 2016 01:26 IST

एका जोडप्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या महिलेसच मारहाण करून डोळ्यांवर कापड बांधून बळजबरीने पळवून नेण्यात आल्याची घटना राजगुरुनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात शुक्रवारी घडली

राजगुरुनगर : एका जोडप्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या महिलेसच मारहाण करून डोळ्यांवर कापड बांधून बळजबरीने पळवून नेण्यात आल्याची घटना राजगुरुनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात शुक्रवारी घडली. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई हिराजी शिंगोले यांना बेदम मारहाण करून घरातून डोळ्याला कापड बांधून पळवून नेल्याच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी ज्ञानेश्वर महादू डांगले, भीमाबाई ज्ञानेश्वर डांगले, अंकुश सखाराम करंडे, सोमनाथ सखाराम करंडे, राजश्री अंकुश करंडे, जया शैलेश गुंजाळ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ज्ञानेश्वर महादू डांगले, भीमाबाई ज्ञानेश्वर डांगले यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने भाजपाच्या तालुका महिला अध्यक्षा सुप्रिया मुळुक, पल्लवी नाईक, मोहिनी राक्षे या महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर संबंधित आरोपींवर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. राजगुरुनगर येथे राहणाऱ्या ताराबाई हिराजी शिंगोले यांच्या घरी जाऊन वरील आरोपींनी, आमची मुलगी तुम्ही पळवून नेली असून तिने सोबत आणलेले दागिने कोठे ठेवले आहेत, कपाटाची चावी दे, म्हणत मारहाण केली. त्यानंतर शिंगोले यांना दुचाकीवर बसवून तिन्हेवाडी रोड येथे आरोपींच्या घरी आणण्यात आले. तेथेही या महिलेस शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ताराबाईच्या डोळ्यांवर कापड बांधून बळजबरीने मोटारीत बसवून पळवले. महिलेच्या भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एस. महाडिक, टी. एस. हगवणे करीत आहेत. पळवून नेलेल्या महिलेची सुटका करण्यात आली आहे. तसेच, पळून गेलेली मुलगी आई वडिलांकडे गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.