शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वर्कआॅर्डर नसताना मेट्रो भूमिपूजन कसे?

By admin | Updated: January 3, 2017 06:22 IST

मुंबईतील शिवस्मारकाचे काम सुमारे तीन हजार कोटींचे आहे. मात्र, अंदाजपत्रकात एक रुपयाचीही तरतूद नाही. पुणे मेट्रोचीही निविदा नाही, की वर्कआॅर्डर नाही.

पिंपरी : मुंबईतील शिवस्मारकाचे काम सुमारे तीन हजार कोटींचे आहे. मात्र, अंदाजपत्रकात एक रुपयाचीही तरतूद नाही. पुणे मेट्रोचीही निविदा नाही, की वर्कआॅर्डर नाही. असे असताना या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन कसे काय करण्यात आले, असा सवाल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतली. पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, श्यामला सोनवणे, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णू नेवाळे, सरचिटणीस सजी वर्की, माजी नगरसेविका निगार बारसकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, की प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेले भूमिपूजन नियमबाह्य आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजन आणि उद्घाटनाची सत्ताधाऱ्यांकडून घाई सुरू आहे. मोदींनी ३१ डिसेंबरला जाहीर केलेल्या योजना म्हणजे मिनी अर्थसंकल्पच आहे. त्यांच्याकडे नोटाबंदीवर बोलण्यासाठी विषय नव्हता, म्हणून त्यांनी या योजनांचा आधार घेतला. मात्र, त्यासुद्धा नियमाला धरून नव्हत्या. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त पिंपरी-चिंचवड करण्यावर काँग्रेसचा भर राहणार असल्याचे पाटील म्हणाले. केंद्रात आणि राज्यात आघाडी सरकार असल्याचा फायदा उठवून राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ता मिळविली. मात्र, महापालिकेतील भ्रष्ट कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)