शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातही ‘माळशेज’च्या सौंदर्याची भुरळ

By admin | Updated: January 14, 2017 03:05 IST

माळशेज घाट म्हणजे फक्तपावसाळ्यातच पर्यटनासाठी पर्यटकांना भुरळ घालतो हा समज आता चुकीचा ठरू लागला आहे, कारण

खोडद : माळशेज घाट म्हणजे फक्तपावसाळ्यातच पर्यटनासाठी पर्यटकांना भुरळ घालतो हा समज आता चुकीचा ठरू लागला आहे, कारण आता हिवाळ्यातही माळशेज घाट पर्यटकांनी फुलू लागला आहे. दिवाळी आणि नाताळच्या सुट्यांमध्ये माळशेज घाटात आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी होती तर इतर दिवशी शनिवार आणि रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशीही पर्यटक माळशेज घाटाला भेटी देत आहेत. सध्या कडाक्याची थंडी असतानाही काही पर्यटक अगदी सकाळपासूनच माळशेजमध्ये येऊन अंगावर कोवळं ऊन घेत पर्यटनाचा आनंद घेत आहेत.दरवर्षी पावसाळ्यात पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यटकांना वर्षासहलीसाठी भुरळ घालणारा माळशेज घाट आता कात टाकू लागला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने माळशेज घाटात ठिकठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यासाठी याचा फायदा होत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यायाने जुन्नर तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.माळशेज घाट निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आहे. सध्या घाट परिसरात सुशोभीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी धोका मात्र कायम आहे. पर्यटक, वनस्पती अभ्यासक, पक्षिनिरीक्षक व संशोधकांना माळशेजची सफर म्हणजे पर्वणी ठरत आहे.माळशेज घाट हा पावसाळ्याच्या दिवसात जेवढा विलोभनीय वाटतो तेवढाच धोकादायकही असतो ही वस्तुस्थिती जरी असली तरी विशेषत: पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेला पाहावयास मिळतो.