शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

फरांदे अ‍ॅकॅडमी-स्टेडियम क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत

By admin | Updated: May 11, 2017 04:51 IST

फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि स्टेडियम क्रिकेट क्लब संघांनी अनुक्रमे पूना क्लब व क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमी संघाचा पराभव करून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि स्टेडियम क्रिकेट क्लब संघांनी अनुक्रमे पूना क्लब व क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमी संघाचा पराभव करून फरांदे करंडक १६ वर्षांखालील आंतरक्लब स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित हाडके आणि प्रेम गव्हाणे यांना सामनावीर किताब देण्यात आला.विधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रोहित हाडके याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर आयोजक फरांदे सीए संघाने पूना क्लबचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पूना क्लब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २९.२ षटकांत सर्व बाद १७४ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये कपिल देडगे २३, अर्शिन कुलकर्णी ३१ व चंद्रकांत सरोज २३ धावा यांनी संघाला पावणेदोनशेचा टप्पा गाठून दिला. फरांदे संघाकडून गोलंदाजीमध्ये सार्थक वाळके (४-१६) व रोहित हाडके (२-३७) यांनी चमकदार कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २३ षटकांत व ४ गडी गमावून पूर्ण केले. सौरभ देवगांडे (२५), रौनक हारकाळे (५०) व रोहित हाडके (४७) यांनी आवश्यक धावा करत संघाला विजय मिळवून दिला.दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रेम गव्हाणे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्टेडियम सीसी संघाने क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला. सीएमए संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३० षटकांत ९ बाद १५५ धावा केल्या. प्रथमेश कारंडे २४, हृषीकेश गेंड ३० व उत्कर्ष चौधरी ३० यांनी संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. गोलंदाजीमध्ये स्टेडियम सीसीकडून प्रेम गव्हाणे ३-३७, अखिलेश गवाळे २-२०, सनथ परदेशी २-४१ यांनी चमकदार गोलंदाजी केली. स्टेडियम क्रिकेट क्लबने हे आव्हान २२ षटकांत व ३ गडी गमावून पूर्ण केले. यश तुंगे २१, प्रेम गव्हाणे ४१ धावा व अखिलेश गव्हाळे (नाबाद ५८) यांनी संघाला विजय मिळवून देत अंतिम फेरीतील संघाचे स्थान निश्चित केले. संक्षिप्त धावफलक (उपांत्य फेरी) : पूना क्लब : २९.२ षटकांत सर्व बाद १७४ (कपिल देडगे २३, अर्शिन कुलकर्णी ३१, चंद्रकांत सरोज २३, सार्थक वाळके ४-१६, रोहित हाडके २-३७) पराभूत वि. फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमी : २३ षटकांत ४ बाद १७८ (सौरभ देवगांडे २५, रौनक हारकाळे ५०, रोहित हाडके ४७, ओम धरावडे १-१७); सामनावीर : रोहित हाडके (फरांदे सीए); क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमी : ३० षटकांत ९ बाद १५५ (प्रथमेश कारंडे २४, हृषीकेश गेंड ३०, उत्कर्ष चौधरी ३०, प्रेम गव्हाणे ३-३७, अखिलेश गवाळे २-२०, सनथ परदेशी २-४१) पराभूत वि. स्टेडियम क्रिकेट क्लब : २२ षटकांत ३ बाद १५६ (यश तुंगे २१, प्रेम गव्हाणे ४१, अखिलेश गव्हाळे नाबाद ५८, आदित्य मावळे १-१०); सामनावीर : प्रेम गव्हाणे (स्टेडियम सीसी).