शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

By admin | Updated: April 22, 2015 05:38 IST

दिवसभरात डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांवरून परावर्तित होणाऱ्या उन्हाच्या झळा, त्यातच वाफेसारखा जाणवणारा उकाडा व सायंकाळी पावसापूर्वी

पिंपरी : दिवसभरात डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांवरून परावर्तित होणाऱ्या उन्हाच्या झळा, त्यातच वाफेसारखा जाणवणारा उकाडा व सायंकाळी पावसापूर्वी आलेले जोरदार वादळी वारे यामुळे मंगळवारचा दिवस पुन्हा अवकाळीचे भय दाटविणारा ठरला. निगडी, यमुनानगर, चिखली परिसरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. शहरात इतरत्र व लगतच्या भागात पाऊस झाला. आठवड्यापासून परिसरात वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने सर्वांना हैराण केले आहे. अधूनमधून येणारे ढगाळ वातावरण, पण पाऊस पडत नसल्याने उकाड्याने सर्वांना बेचैन केले. मंगळवारी तर या विचित्र वातावरणाचा कळसच झाला. आजवर कधी न अनुभवास आलेल्या समुद्रसपाटीच्या दमट वातावरणाचा सामना करण्याची वेळ शहरवासीयांवर आली. एकीकडे घामाच्या धारा वाहण्यास भाग पाडणारा दमटपणा आणि आग ओकणाऱ्या सूर्यामुळे असह्य झालेल्या उन्हाच्या झळा यामुळे थोडा वेळही बाहेर थांबणे जेरीस आणत होते. दुपारनंतर दाटून आलेल्या काळ्या ढगांमुळे पाऊस होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. सायंकाळी ५ च्या सुमारास या कोंदट वातावरणातच जोरदार घालमेल सुरू झाली अन् अचानकच सर्वत्र सोसाट्याचा वारा सुटला. क्षणातच चक्राकार फिरणाऱ्या या वादळात धुळीचे लोट, पालापाचोळा मिसळला. सैरभैर उधळणाऱ्या पालापाचोळ्याची गत पाहून आता पावसाचे मोठे संकट पुढे ठाकल्याचे वाटू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे झुकत होती. निगडी येथे वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक जाहिरातफलकांचे नुकसान झाले आहे. धुळीच्या लोटासह वादळी वाऱ्याचे असे चित्र तेही शहर परिसरात बऱ्याच वर्षांनंतर दिसू लागल्याने प्रथमत: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी जोरदार वादळी पावसाच्या भीतीने वेळीच सुरक्षितस्थळी पोहोचण्याची खबरदारी घेतली.थोड्या वेळातच निगडी, देहूरोड, तळवडे, चिखली, किन्हई या पट्ट्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. निगडी, प्राधिकरण भागात थोडा वेळ गारांसह पाऊस बरसला. सुटीचा आनंद लुटणाऱ्या शाळकरी मुलांनी गारा वेचून खाण्याची संधी दवडली नाही. तळवडे परिसराला पंधरा मिनिटांहून अधिक वेळ पावसाने झोडपून काढले. दिवसभर उन्हामुळे घरी बसलेले शेतकरी सायंकाळी ऊन उतरताच भाजीची तोडणी करण्यास शेतामध्ये गेले. मात्र त्याच वेळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतमालाची तोडणी न करताच माघारी फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली. वारंवार होणाऱ्या पावसाला वैतागून अनेक वीटभट्टी व्यावसायिकांनी कोणत्याही उपाययोजना करण्याचे टाळून विटांना पावसाच्या हवाली केल्याचा प्रत्यय या परिसरात आला. खरेदीदारांची निराशाअक्षय्य तृतीया असल्याने मंगळवारी अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होत. मात्र नेमका याच वेळी पाऊस सुरू झाल्याने अनेकजणांना खरेदी करणे शक्य झाले नाही. काही जणांनी पाऊस थांबल्यावरच बाहेर पडणे पसंत केले.(प्रतिनिधी)