शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सातारा रस्त्यावर हवा भुयारी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:05 IST

मृत्यूचा सापळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बीआरटी रस्त्याची डागडुजी व रस्तारुंदीकरणाचे काम सध्या कात्रज भागात वेगाने सुरू आहे. कुठलाही पुढील विचार न करता ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम चालू असल्याची टीका सर्वत्र होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : मृत्यूचा सापळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बीआरटी रस्त्याची डागडुजी व रस्तारुंदीकरणाचे काम सध्या कात्रज भागात वेगाने सुरू आहे. कुठलाही पुढील विचार न करता ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम चालू असल्याची टीका सर्वत्र होत आहे.सुमारे ७५ कोटींचा निधी खर्च करून, ‘कात्रज ते सातारा’ रस्त्यावरील लक्ष्मीनारायण चौकापर्यंत हे दुरुस्ती व रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. कात्रज डेअरीपासून-भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता जुन्या नकाशामध्ये ठेवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे कात्रज डेअरी, भारती विद्यापीठ, सरहद कॉलेज, कात्रज पीएमपी डेपो, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, भारती विद्यापीठ हॉस्पिटल, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे या भागात नागरिकांनी कसे जायचे, असा प्रश्न नगरसेवक युवराज बेलदरे यांनी उपस्थित केला व त्या संदर्भात आयुक्तांचे लक्षदेखील याकडे वेधले.त्यानंतर आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक वसंत मोरे, नगरसेवक अमृता बाबर यांनीदेखील हा सर्व्हिस रस्ता व्हावा, यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर या रस्ता दुरुस्तीच्या नकाशात बदल करून, ७ मीटरचा हा रस्ता करण्याचे मान्य करण्यात आले व त्याचे कामदेखील सुरू करण्यात आले. यासंदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देऊन या भागाची तातडीने पाहणी करण्याची मागणी करणार असल्याचे बेलदरे यांनी सांगितले.मिनिटाला १०० हून अधिक गाड्या१ ‘कात्रज ते स्वारगेट’ या सातारा रस्त्यावर प्रत्येक मिनिटाला सुमारे १०० हून अधिक गाड्या जा-ये करतात. त्यामुळे ‘कात्रज ते बालाजीनगर’ उडाणपुलापर्यंत रस्ता नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो.२ राजीव गांधीप्राणिसंग्रहालयात दररोज हजारो पर्यटक येत असतात. रस्ता ओलांडताना अनेक वेळा या चौकात अपघात देखील झालेले आहेत.३ त्यामुळे राजीव गांधी ‘प्राणिसंग्रहालय ते कात्रज’डेअरीपर्यंत ग्रेडसेपरेटर (भुयारी मार्ग) केला, तर नागरिकांचीदेखील सोय होईल व येथील सिग्नल निघल्यामुळे कात्रज चौकातील वाहतूककोंडीसुद्धा कमी होईल, अशी मागणी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी केली आहे.