शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण ठाण्याला इमारत मिळणार का?

By admin | Updated: July 12, 2016 01:50 IST

जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यातून दोन वर्षांपूर्वी विभाजन करण्यात आलेल्या भिगवण पोलीस ठाण्याला ‘कोणी हक्काची जागा, इमारत देताय का...?’

भिगवण : जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यातून दोन वर्षांपूर्वी विभाजन करण्यात आलेल्या भिगवण पोलीस ठाण्याला ‘कोणी हक्काची जागा, इमारत देताय का...?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. १५ गावे आणि ३५ वाड्यावस्त्यांचा कारभार सध्या पूर्वीच्या दूरक्षेत्र पोलीस चौकीतूनच करावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना करावा लागतो. पोलीस ठाण्याला तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी; त्याचबरोबर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी भिगवणला नव्या पोलीस ठाण्याला मान्यता मिळाली; परंतु पोलीस ठाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष झाले. भिगवण तसे संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर या ठाण्याअंतर्गत १५ गावे, ३५ वाड्या येतात. कार्यभार मोठा आहे. सध्या ५० पोलीस कर्मचारी या ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांतील काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. उर्वरित पोलिसांच्या जिवावर कायदा-सुव्यवस्था राखावी लागते. महामार्गावरील मोठे गाव, बाजारपेठ असल्यामुळे भिगवणला आसपासच्या गावांसह सोलापूर, नगर या जिल्ह्यांतील नागरिकांचीदेखील रेलचेल असते. भिगवणची लोकसंख्या ११ हजारांहून अधिक आहे. याच परिसरात शैक्षणिक संकुलांची उभारणी झाल्यामुळे शिक्षणासाठी अन्य तालुका, जिल्ह्यातून आलेल्यांची संख्या १५ ते २० हजार इतकी आहे. जातीय सलोखा राखण्याबरोबरच महामार्गावरील अतिक्रमण रोखण्यासह अन्य कामे पोलिसांकडेच आहेत. भिगवणला २३ आॅगस्ट २०१४ रोजी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच इमारतदेखील बांधण्यात येईल, असे सांगितले. मात्र, सध्या पूर्वीच्याच चौकीत कामकाज सुरू आहे. ५० पोलीस कर्मचारी, २ अधिकाऱ्यांना १० बाय १५च्या खोलीतून कारभार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सततचे अपघात, राजकीय नेत्यांचे दौरे आदींचा ताण पोलिसांवर असतोच; मात्र किमान रात्रीच्या वेळी काही वेळ आराम करण्यासाठीदेखील सोय नाही. त्यामुळे पोलिसांच्या मानसिक तणावात वाढ होते. (वार्ताहर)