शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसह मोठ्या प्रकल्पांचे काम थंडावणार

By admin | Updated: January 12, 2017 03:31 IST

महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या अनेक कामांना मंजुरी न मिळाल्याने कोट्यवधी रुपयांची रक्कम

 पुणे : महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या अनेक कामांना मंजुरी न मिळाल्याने कोट्यवधी रुपयांची रक्कम विनाखर्च शिल्लक राहिली आहे. त्याचबरोबर आचारसंहितेमुळे स्मार्ट सिटी, नदीसुधार प्रकल्प, २४ तास पाणीपुरवठा आदी मोठ्या प्रकल्पांची नवीन कामांना मंजुरी मिळू शकणार नाही. कोणतीही नवीन घोषणा या काळात करता येणार नाही. ज्या कामांना मंजुरी मिळून त्यांचे वर्कआॅर्डर निघाल्या आहेत, त्याचबरोबर ते यापूर्वीच सुरू आहेत, त्या कामांवर मात्र आचारसंहितेचा कोणताही परिणाम होणार नाही. महापालिकेच्या वतीने यंदा ५ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. डेंगळे पूल, बीआरटी असे काही मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. मात्र अंदाजपत्रकीय निधीची तरतूद असूनही शिवसृष्टीसह काही प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत. त्यांचा कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक राहिला आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांसाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या कामांना यापूर्वी मंजुरी मिळाली आहे, त्या कामांवर परिणाम होणार नाही. नवीन कामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी आचारसंहितेच्या काळात बैठक होऊ शकणार नाही. त्याचबरोबर नदीसुधार प्रकल्पांच्या नवीन कामांची घोषणा किंवा सुरुवात करता येऊ शकणार नसल्याने दीड महिना काम थांबणार आहे.महापालिकेची मुदत संपत असतानाच यंदा नगर परिषदा निवडणुका, विधान परिषद निवडणूक त्यानंतर लगेच महापालिका निवडणूक अशा आचारसंहिता लागल्याने अनेक विकासकामांचा निधी खर्च होण्यामध्ये अडचणी आल्या आहेत. तरी पालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थायी समिती व मुख्य सभेकडून मंजुरी देण्यात आली. वर्क आॅर्डर काढण्यासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत धांदल उडालेली होती.