शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीतील १२ मंदिरे हटविणार

By admin | Updated: December 10, 2015 01:30 IST

मंदिर, मशीद आणि दर्ग्यांसह, खेड तालुक्यात एकूण १६० धार्मिक स्थळे अनधिकृत असून ती नियमित, निष्कासित किंवा स्थलांतरित करावयाची आहेत,

राजगुरुनगर : मंदिर, मशीद आणि दर्ग्यांसह, खेड तालुक्यात एकूण १६० धार्मिक स्थळे अनधिकृत असून ती नियमित, निष्कासित किंवा स्थलांतरित करावयाची आहेत, म्हणून त्याबाबत काही हरकती असल्यास खेड उपविभागीय किंवा तहसील कार्यालयात लेखी हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे आणि तहसीलदार प्रशांत आवटे यांनी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने आळंदीतील १२ मंदिरे निष्कासित करण्याचा आणि ३ मंदिरे स्थलांतरित करण्याचा कृती आराखडा करण्यात आला आहे. सोसायटी फॉर फास्ट जस्टिस व इतरांनी दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, निष्कासित किंवा स्थलांतरित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून शपथपत्र उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खेड तालुक्यातील १६० धार्मिक स्थळांची प्रारूप यादी बनविण्यात आली आहे. यात १४५ धार्मिक स्थळे नियमित करण्याचा प्रस्ताव असून आळंदीतील १२ मंदिरे निष्कासित करण्याचा आणि ३ मंदिरे स्थलांतरित करण्याचा कृती कार्यक्रम आहे. याबाबत ११ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान हरकती मागविण्यात आल्या आहेत. आळंदीतील ४० फुटी रोड पद्मावती, ३० फुटी रोड, घुंडरे आळी कॉर्नर, कामगार वसाहत, सुयश लॉज देहूफाटा, चाकण चौक, महाराष्ट्र बँकेसमोर गावठाण, भागीरथी नाल्याजवळ गावठाण, व नवीन पूल व जुन्या पुलाच्या मध्ये, धाकट्या पादुकांच्या डाव्या बाजूचे, विठ्ठल रखुमाई चौक, शाळा क्र. २ गावठाण या बारा ठिकाणची गणपती मंदिरे निष्कासित करण्याचा प्रस्ताव आहे. भराव रस्त्यावरचे पितळी गणपती मंदिर, ४० फुटी पद्मावती रोडचे मारुती मंदिर, ३० फुटी रोडचे तुळजाभवानी मंदिर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. (वार्ताहर)