शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवास होणार का?

By admin | Updated: January 14, 2017 03:40 IST

महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणेकरांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून मोफत प्रवास

पुणे : महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणेकरांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाची आचारसंहितेमुळे अंमलबजावणी करण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मोफत प्रवासासाठी मार्च महिना उजाडावा लागणार, असे दिसते.शहरातील वाढती वाहनसंख्या, प्रदूषणाला आळा तसेच पीएमपीकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने महिन्यातील अखेरच्या सोमवारी पीएमपीमधून मोफत प्रवासाला मान्यता दिली आहे. त्यासाठी पीएमपीला सोमवारी मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा देण्यालाही मान्यता मिळाली आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला प्रशासनाची मान्यता मिळालेली नाही. पीएमपी प्रशासनाकडूनही सध्या मोफत प्रवासाच्या प्रस्तावावर फारशी तयारी नसल्याचे दिसते. त्यातच सध्या आचारसंहिता लागू झाल्याने या निर्णयात अडथळा येऊ शकतो. अद्याप पालिका प्रशासनाने या निर्णयाला मान्यता दिलेली नाही. मोफत प्रवासाचा लाभ पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांनाही मिळणार आहे. त्यामुळे हा खर्च केवळ पुणे महापालिकेने का करावा, असाही मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. असे झाल्यास पिंपरी-चिंचवड पालिकेकडून याबाबत ठराव होणे आवश्यक राहील. त्यासाठी आचारसंहितेची आडकाठी येणार आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कोणत्या मार्गावर किती बस सोडायच्या, त्यांच्या वेळा, बसची दुरुस्ती, ब्रेकडाऊन कमी करणे याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. मात्र, अद्याप नियोजनाबाबत कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही. आता त्याला आचारसंहितेचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस तसेच फेब्रुवारी महिन्यातही मोफत प्रवास करता येणार नाही, असे दिसते.