शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज्यात उद्योग येतील का ? - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 03:05 IST

पावसाळा संपताच सरकारने पाण्याचे नियोजन करायला हवे होते; पण राज्यकर्ते परतीच्या पावसावर विसंबून राहिले. आता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला, याची जाहिरात केली जाते

पुणे : पावसाळा संपताच सरकारने पाण्याचे नियोजन करायला हवे होते; पण राज्यकर्ते परतीच्या पावसावर विसंबून राहिले. आता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला, याची जाहिरात केली जाते, हे काय भूषणावह आहे का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. बिअर उद्योगाचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी द्यावे लागते म्हणून विरोध केला की, आम्ही मद्यनिर्मितीच्या विरोधात आहोत, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. पाणी आणि जमीन याच्या जोरावरच राज्यामध्ये उद्योग वाढतात. मग या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणून सरकारला राज्याला प्रगतिपथावर न्यायचे आहे की, राज्यामध्ये औद्योगीकरण होऊ नये यासाठीचे हे डावपेच आहेत याबाबत सरकाने आधी स्पष्ट करावे, अशी टीकाही त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या चव्हाण यांनी आदर्श प्रकरणाबाबत बोलणार नसल्याचे सांगितले.चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. ‘राज्य दुष्काळमुक्त करु’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे कोणती जादूची कांडी आहे माहीत नाही, असा टोला लगावत अशाने राज्यात उद्योग येतील का?’’ असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीबाबत चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले, स्वतंत्र होऊन विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिची चांगली होणार आहे का, स्वतंत्र झाल्याने तेथील विकास होणार आहे का, आणि दरडोई उत्पन्नामध्ये भर पडणार आहे का, हे आधी समजून दिले पाहिजे. उगाच कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचे म्हणून स्वतंत्र होण्याची मागणी करण्यामध्ये काही अर्थ नाही. स्वस्त घर भूलभुलय्या प्रकरणा मध्ये सरकारमधील उच्चपदस्थांच्या भूमिकेची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मेपल ग्रुपच्या अगरवालला अटक का होत नाही, दोषींना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. घरे देण्यामध्ये सरकार अपयशी ठरते तेव्हा असे प्रकार घडतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडवून ‘आयपीएल’ चे सामने रद्द केले. सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही, असेही ते म्हणाले.मोदीसरकारच्या कामावर लोक नाराज आहेत. दिल्ली, बिहार आणि अन्य ठिकाणच्या निवडणुकांमध्ये ते दिसून आले. मात्र, या देशात काँग्रेस आणि भाजपा या दोन मोठ्या पक्षांना बाजूला ठेवून राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे मोदी आणि भाजपाविरोधी आघाडी करताना काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय होऊ शकत नाही, अशी टिपण्णी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय ठरवता येणार नाही. मग, ते नितीशकुमार असतील किंवा अन्य कोणी, असा टोला त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना लगावला. भाजपाविरोधातील आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्वांत विश्वासार्ह व्यक्ती असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले होते. त्यासंदर्भात चव्हाण यांनी भाष्य केले.