शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाचा वनवास संपणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

धनकवडी : वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणेकरांच्या दिमतीला देशात सर्वप्रथम जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) १४ वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात आणली. मात्र ...

धनकवडी : वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणेकरांच्या दिमतीला देशात सर्वप्रथम जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) १४ वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात आणली. मात्र ही सेवा अजूनही सुरू नाही. अर्धवट बांधकामांमुळे वाहतुकीस होणारे अडथळे, वाहनांची वाढती संख्या, प्रदुषण, पालिकेतील सत्तांतर, मेट्रोला मिळालेले प्राधान्य यामुळे बीआरटी कुंठीत झाली. स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाचा १४ वर्षांचा वनवास संपणार का ? बीआरटीची ‘बिकट वाट वहिवाट’ बनणार का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

साध्या बस पेक्षाही आधुनिक बसमध्ये प्रवास करणे म्हणजे बीआरटी प्रकल्प असा समज प्रवासांमध्ये होताेय त्याच दरम्यान एक एक बस बंद पडत गेल्या आणि सुमारे सहा कोटींच्या बस आजमितीला धूळ खात पडून आहेत. सातारा रस्ता बीआरटी हि केवळ सहा किमी अंतरावरच अस्तित्व टिकून आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक दर्जेदार बस कधी उपलब्ध होणार हा प्रश्न प्रवासांसमोर आहे.

कोट

दोनशे कोटींचा चुराडा करुन ही स्वारगेट कात्रज बीआरटी प्रकल्प पुणेकरांसाठी अजूनही डोकेदुखीच ठरत आहे. बीआरटी मार्ग सुरू होण्या आधीच त्याची दुरवस्था झाली आहे.

-सुशांत ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते.

बीआरटी मार्ग सातारा रस्त्याला लागलेले ग्रहण आहे. त्यातून सुटका व्हायची असेल तर प्रशासन, लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने तो प्रकल्प पूर्णत्वास नेऊन नागरिकांच्या सेवेत आणणे ही नैतिक जबाबदारी आहे.

- अँड. दिलीप जगताप - दक्षिण पुणे प्रवासी मंच.

दोन्ही बाजूला स्वयंचलीत दरवाजे असणाऱ्या बस उपलब्ध आहेत. मात्र मार्ग सुरू होण्यापुर्वी एकदा पाहणी केली जाणार आहे. त्रुटी दूर करून सातारा रस्ता बीआरटी मार्ग लवकरच सुरू होईल.

- दत्तात्रय झेंडे, प्रभारी वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएल

पीएमपीएल प्रशासनाने सुचविलेल्या जवळपास सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून काही किरकोळ कामे आठ दिवसांत पुर्ण होतील.

- अतूल कडू, कनिष्ठ अभियंता, महापालिका