शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य संमेलनाध्यक्षांनाही निधी मिळणार का?

By admin | Updated: January 21, 2016 01:22 IST

आजवर नाट्य संमेलनाध्यक्षांचे महत्त्व एका चौकटीपुरतेच मर्यादित राहिले आहे. नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पुष्टी देण्याच्या दृष्टीने कोणतीही

पुणे : आजवर नाट्य संमेलनाध्यक्षांचे महत्त्व एका चौकटीपुरतेच मर्यादित राहिले आहे. नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पुष्टी देण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाध्यक्षांनाही नाट्य क्षेत्रात योगदान देण्यासाठी निधी मिळणार का, अशी चर्चा साहित्य-नाट्य वर्तुळात सुरू आहे.पिंपरी-चिंचवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वच स्तरांवर उंची गाठून नवे पायंडे पाडले. सर्व माजी साहित्य संमेलनाध्यक्षांना मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक लाख रुपयांचा कृतज्ञता निधी देण्यात आला. या पार्श्वभूमीवर, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व माजी अध्यक्षांनाही निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणेनगरीत १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गंगाराम गव्हाणकर म्हणाले, ‘‘आपल्याकडील नाट्य परंपरा खूप समृद्ध आहे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने या परंपरेचे जतन होते. संमेलनात अध्यक्षांचा सन्मान केला जातो. त्या रंगकर्मीने दिलेल्या योगदानामुळे मिळालेला हा सन्मान असतो. अध्यक्षाला निधी मिळाल्यास तो पुढील वर्षभरात अनेक अभिनव उपक्रम राबवून रंगभूमीच्या परंपरेला समृद्ध करू शकतो व तरुणांमध्ये अभिरुची निर्माण करू शकतो. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला वर्षभरासाठी एक ओळखपत्र मिळावे, अशी मागणीही मी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. ’’फय्याज शेख म्हणाल्या, ‘‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच माजी अध्यक्षांना निधी मिळावा, असे माझे मत आहे. आमच्या पिढीच्या अनुभवाचा नवीन पिढीला उपयोग व्हावा, यासाठी खूप काही करावेसे वाटते; मात्र निधीअभावी मर्यादा येतात. नाट्य परिषदेने निधीचा प्रस्ताव संयोजकांसमोर मांडल्यास त्याचा विचार होऊ शकतो. नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद किमान दोन वर्षांसाठी असावे, असेही मला वाटते.’’नाट्य परिषदेचे दीपक करंजीकर म्हणाले, ‘‘सरकारकडून नाट्य संमेलनासाठी मिळणारा निधीच अपुरा असतो. हा निधी संयोजकांतर्फे दिला जाणार असेल, तर उत्तम पायंडा पडू शकतो. ’’(प्रतिनिधी)