शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बसथांबे होणार चकाचक

By admin | Updated: February 11, 2017 02:54 IST

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. तसेच, पुढील महिन्यापासून आगारांप्रमाणेच सर्व प्रमुख बसस्थानकांवर प्रवासी दिन साजरा करणे, तिकिटावर तक्रार क्रमांक छापणे असे विविध निर्णयही प्रशासनाने घेतले आहेत.‘पीएमपी’चा ‘बिझनेस प्लॅन’ तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम एका खासगी संस्थेकडून केले जात आहे. याअंतर्गत पीएमपी व संबंधित संस्थेकडून प्रवाशांच्या ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात आला. तसेच, आॅनलाईन सर्वेक्षण, बस प्रवासी व इतर नागरिकांशी संवाद साधून पीएमपी वाहतूक व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत पालिका आयुक्त व पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष कुणाल कुमार यांनी गुरुवारी पीएमपीतील सर्व वरिष्ठ अधिकारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बिझनेस आराखड्याचे प्राथमिक सादरीकरण करण्यात आले. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक अनंत वाघमारे, मुख्य अभियंता सुनील बुरसे यांच्यासह सर्व आगारांचे व्यवस्थापक या बैठकीला उपस्थित होते.सर्वेक्षणामध्ये बस व थांब्यांची स्वच्छता याबाबत लोकांकडून अधिक नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच, ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, चालक-वाहकांची प्रवाशांशी असलेली अयोग्य वागणूक, थांब्यावर बस न थांबविणे याकडे प्रवाशांनी अधिक लक्ष वेधले आहे. याचा विचार करून संबंधित संस्थेकडून पीएमपीला तातडीने करायच्या उपाययोजना सुचविल्या आहे. याअनुषंगाने कुणाल कुमार यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले आहेत. ‘बिझनेस प्लॅनअंतर्गत सध्या विविध उपाययोजनांवर विचार सुरू आहे. अद्याप आराखडा तयार झालेला नाही. मात्र, त्यांनी तातडीच्या सुचविलेल्या उपाययोजना केल्या जात आहेत. हा आराखडा एप्रिलमध्ये मिळेल,’ असे मोरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पीएमपीचे सुमारे १,७०० बसथांबे आहेत. त्यांपैकी अनेक थांबे अस्वच्छ असून, प्रवाशांना थांब्यावर जाणेही कठीण होते. काही ठिकाणी रस्त्याच्या कामाचा राडारोडा पडलेला असतो. अनधिकृत जाहिरातींमुळे अनेक बसथांबे विद्रूप झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बसथांब्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे.निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थेमार्फत थांब्याची स्वच्छता केली जाणार असून, त्यात सातत्य राखले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.