शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीत

By admin | Updated: April 26, 2017 02:53 IST

गेल्या महिन्यापासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील तापमानाचा पारा चढला असून याचा परिणाम मानवी जीवनावर

पेठ : गेल्या महिन्यापासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील तापमानाचा पारा चढला असून याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच पक्षी आणि प्राण्यांवरदेखील त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. पाण्याच्या, अन्नाच्या शोधार्थ पेठ परिसरात वानराने मानवीवस्तीत प्रवेश केला, तर पक्षीसुद्धा आपली तहान भागविण्यासाठी पाणी असेल तिथे जाऊन आपली तहान भागविताना दिसत आहेत. सातगाव पठार परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता व अतिउष्णता यामुळे माणसांबरोबरच जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पशुपक्षी व वन्यप्राण्यांच्या जीवाला उष्माघाताने धोका होण्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. वाढत्या उकाड्यामुळे गावात व शिवारातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातगावातील तापमान जवळजवळ ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकत असून या भागातील बहुतांशी विहिरी या पूर्णपणे आटल्या आहेत. या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वानर फिरत आहे. पेठ येथील मानवीवस्तीत हे वानर कधी कधी आढळून येत आहे. प्राण्यांबरोबरच पक्ष्यांनादेखील पाण्याची अधिक गरज भासते. अन्नपाण्याच्या शोधात भटकणाऱ्या पक्ष्यांना वेळेत पाणी मिळाले नाही तर ते बेशुद्ध पडत आहेत. चिमणी, कावळा यांसारख्या पक्ष्यांना वेळीच पाणी मिळाले नाही तर उडता उडता त्यांच्या शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन खाली पडून त्यांचा मृत्यू होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. नैसर्गिक पाणीपुरवठा आटतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे अवाहन पक्षीप्रेमी मित्रांकडून केले जात आहे.