शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भारात पत्नीचा गळा आवळून खून

By admin | Updated: April 24, 2017 15:40 IST

रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 24 - रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली. आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.शोभा शेरबहाददूर थापा असे मयत महिलेचे नाव आहे. शेरबहाददूर जब्बरसिंग थापा (वय 40 रा.उज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन, बाणेर मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. मयत महिलेची भाची पूजा राठोड ( वय 25 रा. खराबवाडी, चाकण मूळ रा. मुपो किल्लारी ता.औसा जि.लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीवर 302 कलामांतर्गत चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या जबाबानुसार,  शोभा शेरबहाददूर थापा ही माझ्या आईची लहान बहिण आहे. नातेवाईकांच्या ओळखीने दहा वर्षांपूर्वी तिचे शेरबहाददूर थापा यांच्याशी लग्न झाले. तेव्हापासून मावशी  बाणेर मधील उज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन याठिकाणी राहात आहे. मावशीला मूलबाळ नव्हते, तिचे पती बिल्डिंगमध्ये वॉचमनचे काम करतात. दारू, गांजा पिऊन ते मावशीला वेळोवेळी मारहाण करायचे. तिने ही माहिती माहेरच्या लोकांना दिली होती. नातेवाईकांनी वेळोवेळी लातूरवरून येऊन काका शेरबहाददूर थापा यांना समजावून सांगितले होते. काका तासनतास वेगवेगळ्या लोकांशी आणि बायकांशी गप्पा मारत असे. त्यावरून देखील दोघांमध्ये भांडण होत होती. दहा बारा दिवसांपूर्वी मी व माझे पती मावशीला भेटायला गेलो असता आमच्यासमोरच काकाने मावशीला मारले होते त्यांची भांडणे आम्ही सोडविली होती. 23 एप्रिलला दुपारी 3.45 वाजता काका शेरबहाददूर थापा यांनी फोन करून तुझी मावशी मेली असल्याचे सांगितले. चाकणवरून पुण्यात आल्यानंतर काकांना फोन केला असता त्यांनी मावशी रूग्णालयात असल्याचे सांगितले. मावशीचे प्रेत जवळून पाहिल्यानंतर कपाळावर टेंगुळ आणि गळ्याभोवती रस्सीने आवळण्याची खूण दिसली, याबाबत काकांकडे खोदून विचारपूस केली मात्र त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. अखेर त्या दिवशी सकाळी 11.30 वाजता आमची खूप भांडणे झाल्याने त्यांनी रागाच्या भरात घरात असलेल्या दोरीने मावशीचा गळा आवळून तिला ठार मारले असल्याची कबूली त्यांनी दिली.  या प्रकरणाचा पुढील तपास चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप केंजळे करीत आहेत.