शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

दरोड्याचा बनाव रचून पत्नीचा कुऱ्हाडीने खून

By admin | Updated: May 30, 2015 22:58 IST

दरोड्याचा बनाव रचून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याचा प्रकार कारखेल (ता. बारामती) परिसरात घडला.

सुपे : दरोड्याचा बनाव रचून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याचा प्रकार कारखेल (ता. बारामती) परिसरात घडला. कारखेल परिसरातील भापकरवस्ती येथे हा प्रकार शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडला.सुमो जीप आणण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही, तसेच जमिनीची वाटणी माहेरच्या लोकांनी करून दिली नाही, त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिच्या पतीला चिथावणी दिली. त्यामुळे आरोपीने विवाहिता झोपेत असताना कुऱ्हाडीने, धारदार शस्त्राने तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पोटावर वार करून ठार मारले, अशी तक्रार तिचे चुलते पांडुरंग दादा पवार (वय ६१, रा. निरवी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली आहे. सोनाली महेंद्र भापकर (वय २२, रा. कारखेल) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती महेंद्र महादेव भापकर (वय २५), सासू पद्म भापकर, सासरा महादेव भापकर, मोठा दीर राजहंस भापकर आणि लहान दीर संतोष भापकर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीचा महेंद्र भापकर याच्याशी डिसेंबर २०१२ विवाह झाला होता. या दाम्पत्याला दीड वर्ष वयाचा शौर्य नावाचा मुलगा आहे. आरोपी महेंद्र तसेच त्याचे आई, वडील व दोघे भाऊ मिळून सोनालीचा नेहमीच मानसिक व शारीरिक छळ करीत असत. माहेरून पैसे आणावेत तसेच त्यांच्या वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा मागावा या कारणाने तिचा नेहमीच छळ करीत होते.या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, बारामती शहरचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, यवतचे अजय गोरड, गुन्हे शोध पथक, तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी या घटनेची माहिती घेतली. (वार्ताहर)४शुक्रवारी रात्री सोनाली वडीलोपार्जित मालमत्तेचा हिस्सा मागत नसल्याच्या कारणावरून महेंद्रच्या आई, वडील आणि दोघा भावांनी महेंद्रला चिथावणी दिली. महेंद्रने कुऱ्हाडीने सोनालीच्या डोक्यात, कपाळावर आणि चेहऱ्यावर वार केले. चाकू पोटात भोकसून तिचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. ३०) रात्री तीनच्या सुमारास घडली. त्यानंतर या पाच जणांनी घरात दरोडा पडल्याचा बनाव केला. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आजूबाजूस माहिती घेतली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी महेंद्रने खुनाची कबुली दिली. यासंदर्भातील खबर सोनालीचे चुलते पवार यांनी पोलीस ठाण्यात दिली.