शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

सरकारच्या परीक्षा अर्जात ‘हिंदू’ का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:31 IST

लोकमत न्युज नेटवर्क पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जामध्ये २०१४ पासूनच मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व ...

लोकमत न्युज नेटवर्क

पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जामध्ये २०१४ पासूनच मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन यासाठी ‘मायनॉरिटी रिलीजन’ व इतर सर्व घटकांसाठी ‘नॉन मायनॉरिटी’ असे रकाने समाविष्ट करण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे. ही माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमुद करण्यात येत नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

परीक्षा अर्जामध्ये ‘हिंदु’ शब्द वगळल्याच्या बातम्या प्रसिध्द होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मंडळाने हा खुलासा केला आहे. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जातील मायनॉरिटी रिलीजन या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन या उपरकान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना २०१४ पासून समाविष्ट आहे. तेव्हापासूनच प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा अर्जामध्ये भरून घेण्यात येते.

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय व राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने २०१३ मधये स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाकडे मागितली होती. त्यानुसार मंडळाच्या परीक्षा समितीच्या ठरावाने परीक्षा अर्जामध्ये उपरकान्यांचा समावेश करण्यात आले. मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन हे अल्पसंख्यांक समुपदाय राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार अर्जामध्ये घेण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना माहिती भरण्यासाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

------------------------