शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शौचालय उभारण्याची लाज का वाटते?

By admin | Updated: October 12, 2015 01:26 IST

लोक ग्रामपंचायतीकडे लग्नासाठी पैसे मागत नाहीत. त्यांना फक्त पिण्याचे पाणी हवे असते. आपल्याकडे चोवीस तास पेट्रोल मिळते

माळेगाव : लोक ग्रामपंचायतीकडे लग्नासाठी पैसे मागत नाहीत. त्यांना फक्त पिण्याचे पाणी हवे असते. आपल्याकडे चोवीस तास पेट्रोल मिळते, पण पाणी मिळत नाही. दुबईमध्ये पाऊस पडत नाही, तरीही वाळूत झाडे लावण्याचा प्रयोग केला जातो. ४०० वर्षांपूर्वी जर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात रायगडावर शौचालय वापरले जात होते. तर आता शौचालय उभारण्याची लाज आणि अडचण का वाटते हेच समजत नाही.पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील सांगत होते. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून ‘चला गाव घडवू या’ या अभियानाअंतर्गत आज बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांची ग्रामपरिषद शारदानगर येथील डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडली. या परिषदेस तालुक्यातून महिला सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या वेळी ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, उपसभापती दत्तात्रेय लोंढे, सदस्या संगीता ढवाण, डॉ. प्रतिभा नेवसे, सुदर्शना तावरे, रेखा सोनवणे, संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते. या परिषदेच्या पहिल्या सत्रात पेरे पाटील बोलत होते. ग्रामपंचायतींना थेट निधी खूप मिळणार आहे. तेव्हा गावातल्या प्रत्येक नागरिकाचे हित पाहण्याची आपली भावना असली पाहिजे. गावच्या विकासासाठी आगामी काळात आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.त्यांनी गावकारभारात आलेल्या अडचणी, त्या सोडविताना शोधलेले उपाय याबाबत चर्चा केली. जगातील देशांच्या भ्रमंतीत आलेल्या अनुभवावरून गावच्या विकासाशी घातलेली सांगड सांगता सांगता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. पेरे पाटील म्हणाले आम्ही आमच्या गावात दररोज ज्यांचे वाढदिवस आहेत, अशांची यादी फळ्यावर लिहितो. गेल्या वीस वर्षात सरपंच, उपसरपंच, सदस्य अथवा ग्रामसेवकाने एक पैचाही भ्रष्टाचार केला नाही. गावाने एकोप्याने काम केल्यास चांगले काम घडून येऊ शकते. विकास म्हणजे केवळ इमारती, रस्ते हे स्वरुप नको आहे. पंचायत समिती सभापती करण खलाटे यांनी प्रास्ताविक केले. आर. एम. पुरी यांनी सूत्रसंचालन केले.