शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षे निविदा का नाही?

By admin | Updated: May 12, 2017 05:16 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा गोळा करण्याच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून निविदा का काढली नाही? याचा जाब स्थायी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा गोळा करण्याच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून निविदा का काढली नाही? याचा जाब स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला विचारला. कामाची मुदत संपली असून, निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. त्यानंतर बीव्हीजी कंपनीला चार महिन्याऐवजी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यास स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी मंजुरी दिली. यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे आदेश स्थायीने प्रशासनास दिले. शहरातील कचरा गोळा करण्याचे काम बीव्हीजीला दिले आहे. या कंपनीला कामासाठी आणखी चार महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सभेपुढे प्रशासनाने ठेवला होता. त्यावर झालेल्या चर्चेत या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून निविदा प्रक्रिया राबविली गेली नसल्याचे योग्य आहे का? निविदा का काढली नाही, असा प्रश्न सावळे यांनी आरोग्य विभागाला विचारला. त्यावर प्रशासनाने हे काम पाच वर्षांसाठी दिले होते, असे सभेत सांगितले. ‘कचरा गोळा करणे हे अत्यावश्यक आहे. या कामासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविणे संयुक्तीक नाही. कचऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळेच हे काम पाच वर्षांसाठी दिल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यासाठी २०११ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात पात्र ठरलेल्या कंपनीला २ जानेवारी २०१२ ला आदेश दिला. पहिल्या वर्षी ७१४ रुपये प्रति टन आणि त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी ५ टक्के दरवाढ देण्याच्या अटीसह हे काम दिले होते.