शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भव्यदिव्यतेचा घाट कशाला?

By admin | Updated: February 7, 2017 03:12 IST

डोंबिवलीच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे रसिकांना आकर्षून घेण्यासाठी आयोजकांनी कोटीच्या कोटी उड्डाणाकडे नेणाऱ्या भव्यदिव्यतेकडे अधिक लक्ष पुरविले.

पुणे : डोंबिवलीच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे रसिकांना आकर्षून घेण्यासाठी आयोजकांनी कोटीच्या कोटी उड्डाणाकडे नेणाऱ्या भव्यदिव्यतेकडे अधिक लक्ष पुरविले. तरीही या नेत्रदीपक ‘साहित्यपंढरी’कडे वारकऱ्यांनी पाठच फिरविल्याचे दिसून आले. राजकीय हेव्यादाव्यांमुळे रुसवेफुगवे काढण्यात व्यस्त असलेल्या आयोजकांना दोनदा निमंत्रणपत्रिका छापण्याची वेळ आली. या गदारोळात पत्रिकांचे वितरणच योग्य प्रकारे न झाल्यामुळे अनेक साहित्यिक संमेलनापासून वंचित राहिले. खूप वर्षांनी आगरी यूथ फोरमला हा मान मिळतो आहे, तेव्हा आयोजनात कोणतीच कसर उरता कामा नये. या उत्साहाच्या भरातच साहित्याचे पाईक असलेल्या साहित्यिक मंडळींनाच निमंत्रण देण्याची सवड आयोजकांना मिळाली नाही. मग हा संमेलनाचा बडेजाव का आणि कुणासाठी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. मराठी साहित्यासंदर्भात चर्चेच्या माध्यमातून विचारमंथन घडण्याबरोबरच साहित्याच्या विविध अंगांना परिसस्पर्श करीत भाषेला दिशा देण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाला साहित्यप्रवाहात सामावून घेण्यासाठी गेल्या ९० वर्षांपासून ही साहित्य संमेलनाची पताका फडकविली जात आहे. साहित्यिक आणि रसिक यांच्यात संवादाचा सेतू निर्माण करणे हे संमेलनाचे मुख्य प्रयोजन. पण या दोघांच्या उपस्थितीशिवाय जर संमेलनाचा झेंडा मिरविला जाणार असेल तर संमेलनाच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभे राहण्यासारखे आहे. आज संमेलन पुण्या-मुंबईपुरतेच राहिले असल्याने तो एखाद्या इव्हेंट स्वरूपात साजरा होत असल्यामुळे संमेलनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. या भव्यदिव्यतेच्या मागे खर्चाचे आकडे धावू लागले आहेत, या नादात जे साहित्याचे खरे सेवेकरी आहेत, अशा लेखक-साहित्यिकांनाच संमेलनापासून वंचित ठेवले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे, यंदाचे संमेलनही त्याला अपवाद ठरलेले नाही. राजकीय रुसव्या-फुगव्यांमुळे आयोजकांना संमेलनाच्या पत्रिका दोनदा छापाव्या लागल्या, आयोजकांना या निमंत्रणपत्रिकांचे वाटप करणेही शक्य झाले नाही. याच्या परिणामस्वरूप अनेक चांगली साहित्यिक-लेखक मंडळी संंमेलनापासून दूर राहिली. नेहमीप्रमाणे संमेलनात साहित्यिकांपेक्षा निमंत्रित लेखक-कवी यांचीच ‘भाऊगर्दी’ अधिक दिसली. संमेलनाला उत्सवी स्वरूप आले आहे, असे म्हटले तरी सर्वांना संमेलनात सामावून घेणे अपेक्षित असते, मात्र तसे झाले नसल्याची खंत साहित्यिकांनी व्यक्त केली.