शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपु-या शिक्षणासाठी पूर्ण शुल्क का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ॲानलाईन शिक्षणाला मर्यादा असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात बसून मिळणारे शिक्षण ॲानलाईनमधून मिळत नाही. तसेच विद्यार्थ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: ॲानलाईन शिक्षणाला मर्यादा असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात बसून मिळणारे शिक्षण ॲानलाईनमधून मिळत नाही. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य व इतर मुलभूत सुविधांचा लाभ घेतला नाही. त्यामुळे अपु-या शिक्षणासाठी आम्ही शाळांना पूर्ण शुल्क का द्यावे?,असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे शासनानेच शाळांना शुल्क कमी करण्यासाठी भाग पाडावे,अशी मागणीही पालकांकडून केली जात आहे.

राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील शाळा येत्या 3 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षण घ्यावे लागणार आहे. प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण आणि ॲानलाईन शिक्षण यात खूप मोठा फरक आहे. त्यातच कोरोना काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना शाळांकडून शुल्कात कोणतीही कपात केली जात नाही. तसेच शुल्क न भरल्याने काही शाळा विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणापासूनही वंचित ठेवत आहेत.

ॲानलाईन शिक्षण सुरू असतानाही अनेक शाळांकडून शंभर टक्के शुल्काची वसूली करत आहेत. परंतु,आमच्या पाल्यांना प्रत्यक्षात शिक्षण दिले तरच पूर्ण शुल्क भरू,असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. येत्या 13 डिसेंबरनंतर शहरातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार होता.त्यानुसार आता 3 जानेवारीनंतरच शहरातील शाळांची घंटा वाजण्याची शक्यता आहे.परिणामी आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणावरच अवलंबून रहावे लागणार आहे.

---------------------

शासनाने शाळांना पाणीपट्टी,वीज बील यांसह इतर करांमध्ये सवलत द्यावी. त्यामुळे शाळा कोरोना काळात पालकांकडून शुल्कवसूलीचा तगादा लावणार नाही. परिणामी शाळांबरोबर पालकांनाही दिलासा मिळेल.

- दिलीप विश्वकर्मा, महापॅरेंटस्

---------------------

ग्रामीण भागाप्रमाणे शहरातील शाळाही सुरू झाल्या असत्या.परंतु,प्रशासनाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला नसावा. शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत सुरू होणार नाहीत. परंतु, विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण सुरू राहिल.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघटना

-----------