शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चार एफएसआय कशासाठी?

By admin | Updated: February 6, 2017 06:19 IST

विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीत चुकीच्या पद्धतीने तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुणेकर नागरिकांना यामुळे कोणताही फायदा होणार नसून

पुणे : विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीत चुकीच्या पद्धतीने तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुणेकर नागरिकांना यामुळे कोणताही फायदा होणार नसून, चार एफएसआय कशासाठी हवा आहे, असा सवाल नगर विकास तज्ज्ञांनी उपस्थित केला. लोकसंख्येची घनता वाढली, तर रस्ते, पाणी, वाहतुकीसारख्या सोयी सुविधांवर ताण येऊन शहर पूर्णपणे बकाल होईल, असे मत नगर विकास तज्ज्ञांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचाच्या वतीने पुण्याचा विकास आराखडा व विकास नियमावली शहराच्या हिताची आहे का? या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. २००७ ते २०२७ दरम्यान पुणे महानगरपालिकेने केलेल्या विकास आराखड्याचे विश्लेषण या चर्चेदरम्यान करण्यात आले. नगररचना तज्ज्ञ रामचंद्र गोहाड, अनिता बेनिंजर गोखले, परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ, अभियंत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रताप रावळ, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी व्यासपीठावर उपस्थित होते. विकास नियंत्रण नियमात जमिनीचा वापर प्रस्तावित केला जातो. विकास नियंत्रण नियम हा विकास आराखड्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे विकास नियंत्रण सुटसुटीत करणे आवश्यक आहे. पुण्याचा विकास आराखडा तयार करताना लोकसंख्येची घनता कमी करणे, पार्किंंगचे नियोजन करणे आवश्यक असताना, चार एफएसआय देऊन १०० मीटरपेक्षा उंच इमारती कोणासाठी बांधायच्या आहेत, असा सवाल त्यांनी केला. - रामचंद्र गोहाड विकास आराखडा मंजूर करताना नागरिकांच्या हरकती, सूचना विचारात घेण्यात आल्या नाहीत. आरक्षणाची पूर्तता केल्याविषयी नोंद नाही. पूर्वी डीसी रुल्स म्हणजे घनता नियंत्रण नियम (डेन्सिटी कंट्रोल) असा अर्थ अभिप्रेत होता. तो बदलून विकास नियंत्रण नियम (डेव्हलपमेंट कंट्रोल) कधी झाला, हे कळलेच नाही. विकास आराखड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा फायदा होणार नसून, चार एफएसआय कोणासाठी आणि कशासाठी हवा आहे? - अनिता गोखले