शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या जिल्ह्यात हजार कोटींच्या भूखंडावर डोळा कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST

सुकृत करंदीकर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तब्बल बावीस वर्षांपूर्वी रद्द झालेल्या सहकारी संस्थेच्या वारसांनी त्या संस्थेला मिळालेल्या सरकारी ...

सुकृत करंदीकर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तब्बल बावीस वर्षांपूर्वी रद्द झालेल्या सहकारी संस्थेच्या वारसांनी त्या संस्थेला मिळालेल्या सरकारी जागेवर दावा सांगण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात घडतो आहे. सहकाराच्या कोणत्याच कायदेनियमात न बसणारा हा घाट घातला जात आहे, कारण एकच. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील तळेगाव दाभाडे (ता. मावळ) परिसरात असणारा सलग १४० एकरांचा भूखंड. येथे आठशे ते हजार कोटी रुपयांचा व्यावसायिक प्रकल्प उभारण्याच्या मनसुब्याने काही राजकारणी, धनदांडगे आणि बडे बिल्डर या भूखंडावर डोळा ठेवून आहेत.

त्यासाठी राज्य सरकारचेच एक खाते राज्य सरकारच्याच मूळ मालकीच्या तब्बल १४० एकर जमिनीवर पाणी सोडण्याची तयारी करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात हा प्रयत्न चालू आहे. विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था, पुणे) यांनी या प्रकरणी बेकायदेशीर आदेश दिला असल्याचे समजते. सध्या हे प्रकरण राज्याच्या सहकारमंत्र्यांकडे प्रलंबित आहे.

तळेगाव दाभाडे येथे अशोक सहकारी सामुदायिक शेतकी संघ मर्यादित (तळेगाव दाभाडे) ही सहकारी संस्था १९५५ मध्ये स्थापन झाली. या संस्थेला सामुदायिक शेतीसाठी १४० एकर शासकीय जमीन देण्यात आली. मात्र ज्या उद्देशाने संस्थेची स्थापना झाली ती उद्दिष्टपूर्ती संस्था कधीच करू शकली नाही. या संस्थेची नोंदणीच १९९८ मध्ये रद्द करून ही संस्था विघटित करण्यात आली. या संस्थेचे एकही सभासद हयात नाहीत. मात्र त्यांच्या वारसांना पुढे करुन संस्थेला मिळालेल्या सरकारी जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरु आहे.

------------------

कधी, काय घडले?

३ ऑक्टोबर १९८६ - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये सहकारी संस्थेच्या अस्तित्वासाठी आवश्यक सभासद संख्या न राखता येणे, जमीन पडीक राहणे, वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही सभासद कामावर न येणे आदी कारणे नमूद करत मावळच्या तत्कालीन सहायक निबंधकांनी अशोक संस्था विसर्जित करण्याची मध्यंतरीय आज्ञा काढली.

१२ डिसेंबर १९८९ - वडगाव मावळच्या तत्कालीन सहायक निबंधकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या १०३ (२) कलमानुसार ही संस्था अवसायानात काढली.

३ जानेवारी १९९२ - राज्याच्या तत्कालीन सहकार आयुक्तांनी सभासदांची कोणतीही हरकत नसून त्यांची सकारात्मक मान्यता असल्याने संस्थेची जमीन भाडेकराराने देण्याची शिफारस केली.

१४ जानेवारी १९९२ - संस्थेच्या अवसायकांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाला संस्थेची जमीन ९९ वर्षांच्या भाडेकराराने देण्याची परवानगी काही अटींसह दिली.

१७ मार्च १९९८ - अशोक सहकारी सामुदायिक शेतकरी संघ मर्यादित या संस्थेचे अस्तित्व संपवण्यात येत असून सदर संस्थेची नोंदणी रद्द करून संस्था विघटित करण्यात आली आहे, असा आदेश सहायक निबंधक, सहकारी संस्था (वडगाव मावळ) यांनी काढला.

---------------

बावीस वर्षांनी आली जाग

‘अशोक संस्थे’कडील १४० एकर जमीन पणन मंडळाला ९९ वर्षांसाठी देण्याचा करार करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार करारनामा करण्यापूर्वी पणन मंडळाने एकरकमी वीस लाख रुपये संस्थेच्या अवसायकांकडे जमा केले. संस्थेची नोंदणी रद्द झाल्यावर जमिनीची मालकी निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे राहील, असे निश्चित करण्यात आले होते. करारानुसार पणन मंडळाकडे जमिनीचे हस्तांतरण झाले. मात्र या घटनेस २२ वर्षे उलटून गेल्यावर ‘अशोक संस्थे’च्या मूळ सभासदांच्या वारसांना पुढे करून या जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

-------------