शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरी रोखणार कोण?

By admin | Updated: November 6, 2014 00:29 IST

मीटरमध्ये फेरफार करून वेगवेगळ्या पद्धतीने जोड घेत मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात आहे.

मिलिंद कांबळे, पिंपरीमीटरमध्ये फेरफार करून वेगवेगळ्या पद्धतीने जोड घेत मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात आहे. विद्युतरोहित्र बॉक्समधून (डीपी) आणि थेट उघड्या तारेवर आकडा टाकून वीज घेतली जाते. घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि शेती या वर्गातील ग्राहक निरनिराळ्या तंत्रांचा अवलंब करीत सर्रास वीजचोरी करतात. या वाढत्या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) पिंपरी आणि भोसरी विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी दर महिन्यास प्रत्येकी साडेचौदा टक्के नुकसान होत आहे. ही तूट भरून काढण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे. मीटर बिलाची रक्कम वाचविण्यासाठी वीजचोरीचा प्रकार केला जातो. घरगुती व व्यापारी (कर्मशिअल) ग्राहक असलेले नागरिक मीटरमधून बायपास जोड घेतात. दुसऱ्या मीटरमधून छुप्या तऱ्हेने पुरवठा वळवितात. मीटर रीडिंग कमी होण्यासाठी त्यात फेरफार करतात. मीटरचा वेग नियंत्रित करतात. तसेच, डीपी बॉक्समधून किंवा केबलला थेट वायर जोडून वीज घेतात. काही ठिकाणी उघड्या तारांवर आकडा टाकून घरात वीज घेतली जाते. या पद्धतीने झोपडपट्टी, नागरी वसाहत, चाळ या भागांत ग्राहक सर्वाधिक वीज चोरी करीत असल्याचे महावितरणला दिसून आले आहे. याचपद्धतीने वीजचोरी आणि रीडिंग कमी करण्यात दुकानदार, व्यापारी, लघुउद्योग, कार्यालय, संस्थाही आढळून आले आहेत. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या हौसिंग सोसायट्यामधूनही वीज चोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तेथे रिमोट कंट्रोलद्वारे मीटर नियंत्रित करून मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. त्यामुळे रीडिंग कमी दाखविले जाते. येथे मीटरमध्ये फेरफारचा प्रकारही केला जातो. शेती आणि ग्रामीण भागात थेट आकडे टाकून वीज घेतली जाते. वीज पंपाद्वारे विहीर, बोअर, नदी येथून पाणी खेचण्यासाठी या विजेचा वापर होतो. श्रीमंत शेतकरीही या मार्गाचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. मीटर बसलेल्या ठिकाणी बोअरिंगला पाणी बंद झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी बोअर घेतला जातो. तेथे आकडा टाकून वीज घेण्याचे प्रकार घडतात. या सर्वच पद्धतीने होणाऱ्या वीज चोरीमुळे पिंपरी आणि भोसरी विभागीय कार्यालयाचे दर महिन्यास प्रत्येकी साडेचौदा टक्के नुकसान होत आहे. एकूण पुरवठा केलेल्या विजेपैकी ८५ ते ८६ टक्के विजेच्या मोबदल्यात रक्कम वसूल होते.