शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीस जबाबदार कोण?

By admin | Updated: January 14, 2017 02:43 IST

शहरातील वाहतूककोंडीच्या समस्या गेल्या काही वर्षांत जटिल झाली असून, यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही.

कामशेत : शहरातील वाहतूककोंडीच्या समस्या गेल्या काही वर्षांत जटिल झाली असून, यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे या कोंडीचा त्रास वाहनचालक, पादचारी, सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक आदींना होत आहे. या वाहतूककोंडीला नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत. कामशेत ही मावळातील मध्यवर्ती बाजारपेठ असून नाणे, पवन, अंदर मावळासह आजूबाजूच्या सुमारे ७० गावांचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. शहराजवळूनच जुना मुंबई-पुणे महामार्ग व लोहमार्ग असल्याने रोज हजारोच्या संख्येने नागरिक शहरात विविध कामांसाठी येत असतात. शहरात पूर्वीपासून मोठी बाजारपेठ असून अनेक शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र, अनेक खासगी दवाखाने, बँका, पोस्ट आॅफिस, रेल्वे स्टेशन व इतर अनेक महत्त्वाची ठिकाणे असल्याने विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शेतकरी, व्यावसायिक आदींची शहरात मोठी वर्दळ असते. रस्त्यावर तासन्तास उभी राहणारी वाहने, बेशिस्त वाहनचालक, व्यापाऱ्यांची वेळी-अवेळी येणारी मालवाहतूक वाहने, हातगाडीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाले, बेशिस्त पथचालक, वाहन पार्किंग सुविधेचा अभाव व इतर अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहतूक पोलिसांच्या सततच्या कारवाईनेहीही कोंडी सुटत नसून, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत व नागरिकांच्या उदासीनतेमुळे वाहतूककोंडीची समस्या अवघड झाली आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात अतिक्रमणांवर केलेल्या कारवाईत गरिबांच्या टपऱ्या हटवून श्रीमंतांच्या अतिक्रमणांकडे काणाडोळा केल्याचा आरोप अनेकजण करत आहेत. शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढली आहेत. मुख्य रस्त्याच्या साइडपट्ट्या दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक दुकानदारांचा माल रस्त्यावर येत असून, पादचारी, तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुचाकी वाहने उभी करण्यासाठी थोडीही जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वाहने रस्त्यावरच लावली जातात. शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्यानंतर पार्किंगला शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली. पण, वाहने लावण्यासाठी साइडपट्ट्याच शिल्लक नसल्याने या योजनेचा उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उभारला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार डी. बी. खंडागळे व तीन वॉर्डन यांनी मागील एका डिसेंबर महिन्यातच ४२७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. यातून ६७,८०० रुपये दंड वसूल केला आहे. यात १३ जणांवर ड्रंक इन ड्राइव्हचे गुन्हे दाखल केले आहेत. १३ अवैध प्रवासी वाहतूक, १६९ लेनकटिंग, १०८ विनाहेल्मेट, ६ सीटबेल्ट, ३६ वाहन कागदपत्रे नसणे, ६३ ट्रिपलसीट, २ नो पार्किंग, ५ मालवाहतूक, २ विना वाहन परवाना, ९ अल्पवयीन चालक, २ रॉँग साइड, २ मोबाइलवर बोलणे, १० इतर आदी आहेत. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असूनही वाहतूककोंडीची समस्या सुटत नाही. ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य रस्त्याच्या साइडपट्ट्या खुल्या करीत नाहीत, तोपर्यंत ही कोंडीची समस्या सोडवणे कठीण असल्याचे पोलीस अधिकारी व वाहतूक पोलिसांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)