शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारतीला अभय कोणाचे?

By admin | Updated: April 12, 2017 04:03 IST

हद्दवाढीमुळे बारामतीचा विस्तार वाढला आहे. त्याचबरोबर नागरीकरणदेखील वाढत आहे; मात्र अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे.

बारामती : हद्दवाढीमुळे बारामतीचा विस्तार वाढला आहे. त्याचबरोबर नागरीकरणदेखील वाढत आहे; मात्र अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे. शहरातील म्हाडा कॉलनीमधील सर्व बाजूने मिळकतधारकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत यापूर्वीदेखील तक्रारी झाल्या. परंतु, त्यावर ना नगरपालिकेने कारवाई केली, ना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी. या उलट त्या ठिकाणी असलेल्या म्हाडाच्या आजी-माजी अधिकाऱ्यांनीच अतिक्रमण करून व्यावसायिक गाळे, निवासी सदनिका बांधल्या. याशिवाय रस्त्याला लागूनच दुकाने बांधली आहेत. त्यामुळे अगदी पदपथाला लागूनच अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर नियंत्रण कोणीच ठेवत नाही.नगरपालिका फक्त ‘शास्ती’च्या मागे लागून उत्पन्न मिळविण्यासाठीच या अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत आहेत, तर सेवारस्त्याच्या लगत बांधलेल्या टोलेजंग बेकायदेशीर इमारतीला प्रशासनाने अभय दिल्याचेच चित्र आहे.म्हाडाच्या जवळपास सर्वच मिळकतधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणीच धजावत नाही. राजकीय फायद्यासाठी या अनधिकृत बांधकामाला बळ दिले आहे. म्हाडा कॉलनीलगतच रिंगरोडला लागूनच अनेक दुकाने अगदी सर्व नियम धाब्यावर बसवून बांधण्यात आले आहेत. त्याकडेदेखील दुर्लक्ष केले जाते. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीच मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केल्यामुळेच इतरांचेदेखील फावले. नगरपालिका मात्र तक्रार होऊन देखील बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालय ते पेन्सिल चौक एमआयडीसीपर्यंत सेवारस्ता केला आहे. हा सेवारस्ता करतानादेखील भूसंपादन करताना दुजाभाव केल्याचे दिसून येते. आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. नुकताच त्याचा ठराव झाला. अगदी न्यायालयाच्या इमारतीच्या काही मीटर अंतरावरच टोलेजंग इमारत बांधण्यात आली आहेत. त्यासाठी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसविले आहेत. कायद्याची व्याख्या शिकविणाऱ्यांकडूनच बेकायदेशीर इमारती बांधले आहेत. त्याचे हे उदाहरण. आता इमारतीच्या तळमजल्यापासून व्यावसायिक गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. तिथे व्यवसाय सुरू आहे. रस्त्याच्या लगतच हे अतिक्रमण आहे. त्यापुढे व्यावसायिकांना मात्र मोठ्या प्रमाणात सेटबॅक सोडण्यास भाग पाडले आहे. एकाने कायदा पाळायचा, दुसऱ्याने तो मोडायचा हा नियम बारामतीतच लागू होतो. बहुमजली इमारत बांधण्यासाठी असणारे अनेक नियम, अटी ही इमारत बांधताना मोडीत काढण्यात आली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या.नगरपालिका प्रशासन मात्र त्याबाबत काहीच भूमिका घेत नाहीत. अनधिकृत बांधकामांवर जास्तीचा दंड आकारून नगरपालिकेचा महसूल वाढविण्यासाठी या अनधिकृत इमारतींना अभय दिले जाते. त्यामुळे भविष्यात ज्यांनी जागा सोडल्या, त्यांच्याकडून देखील अतिक्रमणे झाल्यास दोष द्यायचा कोणाला, असा प्रश्न आहे. या सेवारस्त्याच्या लगत बांधलेल्या या इमारतीमध्ये वैद्यकीय सेवेसह कपड्यांची दुकाने आदी व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे तेथे खरेदीला आलेले अथवा वैद्यकीय सेवेसाठी आलेल्यांना सेवारस्त्यावरच दुचाकी, चारचाकी गाड्या लावाव्या लागतात. त्यामुळे सेवारस्त्याचा वापर नेमका कशासाठी, असा प्रश्न देखील निर्माण झाला.(प्रतिनिधी)एसटी सोसायटीतील काम सुरूच...मात्र, आज सहयोग सोसायटीसमोरील एसटी कामगार सोसायटीत सेवारस्त्याला लागूनच असलेले कामाबाबत गांभीर्याने नगरपालिका प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी फक्त समज देण्यात आली होती. याच मिळकतधारकाने हा भाग जळोची ग्रामपंचायतीच्या हद्दीत असताना व्यावसायिक गाळे बांधले होते. त्यावेळी भविष्यात सेवारस्ता झाल्यास हे गाळे काढून टाकण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र, आता त्यावरच बांधकाम सुरू झाले आहे. ‘लोकमत’चे कौतुक ...‘लोकमत’ने अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेच्या बाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले. जे कायदेशीर बाबी पूर्ण करतात, त्यांना त्रास होतो. मात्र, बेकायदेशीर इमारती बांधणाऱ्यांना अभय दिले जाते, असा अनुभव असल्याचे अनेकांनी सांगितले. अनधिकृत बांधकामे निदर्शनास आणली : देशमुखनगरपालिकेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले की, या अनधिकृत इमारतींच्या कामांबाबत ‘लोकमत’ने निदर्शनास आणले आहे. ही बाब चांगली आहे.