शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबटया जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:37 IST

राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे . 

राजुरी : राजुरी गावात एकाच आठवड्यात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याची घटना नुकतीच घडली आहे. राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या बुधवारी (दि. ४) पहाटे पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास उपळीमळ्यामध्ये गणेश नायकवडी यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या अडकला आहे .  राजुरी परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घराच्या अंगणात भुईमूग वाळायला टाकणाऱ्या अक्षदा हाडवळे या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, गुंजाळवाडी (खराडीमळा) येथील शिवाजी मनाजी बोरचटे यांच्या गोठ्यात प्रवेश करत दोन शेळ्यांचा फडशा पाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच बिबट्यांनी बोरचटे यांच्या घरासमोर तासभर ठिय्या आंदोलन केले. कोंबरवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात गोविंद कुंजीर हे जखमी झाले होते, तर वंदना किसन यादव या बचावल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी शुक्रवारी रात्री जो बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे, त्या शेतकऱ्याच्या बिबट्याने एकाच आठवड्यात चार शेळ्या ठार केल्या होत्या. त्यामुळे ह्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. तसेच राजुरी येथील अक्षदा हाडवळे या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. सुदैवाने या हल्ल्यातून ती मुलगी वाचली आहे. परंतु या ठिकाणी वन विभागाने अद्याप पिंजरा लावलेला नाही. या ठिकाणी दररोज बिबट्या येऊन बसत आहे. त्यामुळे आम्हाला भीती वाटत असून, वनखाते आमचा जीव गेल्यानंतर या बिबट्याला पकडणार का, असा प्रश्न ज्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता, त्या मुलीचे वडील अशोक हाडवळे यांनी वनखात्याला विचारला आहे. या ठिकाणी येत्या दोन दिवसांनंतर येथे पिंजरा लावण्यात येईल, अशी माहिती वन परिक्षेत्राधिकारी येळे, वनरक्षक जे. बी. सानप, वनरक्षक ए. डी. तांगडवार यांनी दिली. 

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्याforest departmentवनविभाग