शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

बेरोजगारांची संख्या वाढली असताना ६६६ 'ग्रा.पं'मध्ये रोहयोचे एकही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST

उदरनिर्वाहाचा प्रश्न : अनेक ग्रामपंचायतींनी तातडीने रोहयोची कामे सुरू करण्याची केली मागणी पुणे : कोरोना महामारीच्या काळात एकीकडे अनेकांच्या ...

उदरनिर्वाहाचा प्रश्न : अनेक ग्रामपंचायतींनी तातडीने रोहयोची कामे सुरू करण्याची केली मागणी

पुणे : कोरोना महामारीच्या काळात एकीकडे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. तर दुसरीकडे अनेक गावांत रोजगार हमी योजनेचे एकही काम झालेले नाही. पुणे जिल्ह्यात ६६६ ग्रामपंचायतींनी अद्याप एकही काम सुरू केले नाही. बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांबरोबरच या ग्रामपंचायतीने देखील गावात रोहयोची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यवसायाबरोबर शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी वाढत आहे. याबाबत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी नव्याने अर्ज केले आहेत.

----------

पॉइंटर्स

'रोहयो'वर शून्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती

: - ६६६

------------

रोहयोवर शून्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती तालुकानिहाय आकडेवारी

* आंबेगाव :- ५२

* बारामती :- ७४

* भोर :- ९०

* वेल्हा :- १९

* दौंड :- ४४

* हवेली :- २०

* इंदापूर :- ७२

* जुन्नर :- ७६

* खेड :- ५६

* मावळ :- ४६

* मुळशी :- ४७

* पुरंदर :- ४३

* शिरूर :- ५५

एकूण :- ६६६

-----------

सरपंच काय म्हणतात ?

कोट

रोजगार हमी योजनेत मिळणारी रोजंदारी समान मिळावी. तसेच, तांत्रिक शिक्षण घेतलेल्या, पण बेरोजगार असलेल्या तरुणांना काम मिळावे.

- सविता अशोक माशेरे, सरपंच, अमदाबाद

----

कोट

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेवर कायमस्वरूपी काम मिळायला हवे. तसेच प्रत्येक कामगाराच्या कौशल्याप्रमाणे काम मिळायला हवे.

- राजेंद्र दाभाडे, सरपंच, पिंपरखेड

--------

हाताला काम नाही, अन 'रोहयो'ही नाही

कोट

ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस याकडे तरुण वळला आहे. मात्र, कोरोनामुळे तोही ठप्प आहे. त्यामुळे रोहयोत जॉब कार्ड काढून कौशल्याप्रमाणे काम मिळावे.

- सुधीर पुंडे, कान्हूर मेसाई

---

तरुणांनी ग्रामीण भागात पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. यात संपूर्ण कुटुंब काम करत आहे. मात्र, कोरोनामुळे तेही बंद आहेत. पोल्ट्री चालकांनाही रोहयोत काम मिळावे.

-----

अधिकारी कोट

वैयक्तिक लाभाच्या योजनांवर आपण भर देत आहोत. कोरोनाकाळात प्रत्येक कुटुंबात काम देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी नरेगा आयुक्तांना वाढीव बजेट सादर केले आहे.

- संजय तेली, उपजिल्हाधिकारी, रोहयो