शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

प्रभाग सदस्यपदी संधी कोणत्या गटाला?

By admin | Updated: June 18, 2015 23:42 IST

महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज मागवण्यात आले असून, प्रत्येक प्रभागातून तिघांची निवड होणार आहे.

भोसरी : महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज मागवण्यात आले असून, प्रत्येक प्रभागातून तिघांची निवड होणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने सर्वच प्रभागांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरात एकही उमेदवार निवडून आला नाही. एकीकडे पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीमुळे भोसरीत झालेली पक्षाची वाताहत, तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपाची धरलेली वाट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांची मोठी कसरत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग सदस्यपदाच्या माध्यमातून निष्ठावंतांना संधी देऊन भोसरी मतदारसंघात पक्षात झालेली मरगळ दूर करणार, की २०१७ची महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लांडगे गटाला सदस्यपदासाठी संधी मिळणार, याबद्दल भोसरीत मोठी उत्सुकता आहे.लांडगे यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील काही नगरसेवक आहेत. त्यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. मात्र, आमदार लांडगे हे अपक्ष निवडून आल्याने त्यांनी सत्ताधारी भाजपालाही जवळ केले असल्याचे चित्र सध्या तरी भोसरीत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आल्यावर लांडगे यांच्या कार्यालयास भेट दिली होती. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. लांडगे यांनी निवडून आल्यानंतर अनेक कामांचा धडाका लावला आहे, तर माजी आमदार विलास लांडे यांनी शांत राहत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार लांडे हे काहीच भूमिका घेत नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या शिक्षण मंडळ सभापतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या गटाला हे पद मिळवून देत आपण अजूनही राष्ट्रवादीतच सक्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीतीलच एका गटबाजीमुळे आपला पराभव झाला असल्याची खंत लांडे यांना आहे. त्यामुळे ते पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत.लांडे गटातील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सदस्यपदासाठी अर्ज केले आहेत. तसेच, लांडगे यांच्या गटातीलही अनेकांनी आपला अर्ज दाखल केला असल्याने कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता वाढू लागली आहे. भोसरी मतदारसंघात दोन्ही प्रभागांत सहा सदस्यांसाठी इ प्रभागासाठी २१, तर फ प्रभागासाठी ३५ इच्छुकांनी आपले अर्ज महापालिकेतील गटनेत्या मंगला कदम यांच्याकडे दाखल केले आहेत. कोणत्याही गटाकडून कोणीही अर्ज दाखल केले असले, तरी कोणाची निवड होणार, हे अजित पवारच ठरवणार, हे निश्चित आहे. (वार्ताहर)-भोसरी मतदारसंघात महापालिकेचे दोन क्षेत्रीय प्रभाग आहेत. या दोन्ही प्रभागांत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. या दोन प्रभागांत प्रत्येकी तीन असे एकूण सहा सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. -गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय मोट बांधत बंडखोरी करून नगरसेवक महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला. अपक्ष निवडून आल्यानंतरही पिंपरी मतदारसंघातील महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत लांडगे राष्ट्रवादीचा प्रचार करत होते.