शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

...तेव्हा प्रेक्षक कुठे असतो?

By admin | Updated: January 25, 2017 02:15 IST

मराठी प्रेक्षक हा नाट्यवेडा आहे असे सांगितले जाते. मात्र जेव्हा नाट्यसंस्कृतीवर सेन्सॉर बोर्ड किंवा तत्सम संस्कृतिरक्षक प्रवृत्तींकडून

पुणे : मराठी प्रेक्षक हा नाट्यवेडा आहे असे सांगितले जाते. मात्र जेव्हा नाट्यसंस्कृतीवर सेन्सॉर बोर्ड किंवा तत्सम संस्कृतिरक्षक प्रवृत्तींकडून हल्ला होतो, राम गणेश गडकरींचा अपमान केला जातो तेव्हा त्याच्या विरोधात केवळ दहा ते वीस कलाकारच रस्त्यावर येतात, ही लढाई काय एकट्या कलाकारांची आहे का? अशा वेळी ना्यवेडा माणूस कुठे जातो? जो लढायला उभा आहे त्याच्यामागे एक प्रेक्षक म्हणून उभे राहाणार नसाल तर मराठी माणसाला नाट््यवेडा हे बिरुद लावायचे का ? अशा परखड शब्दातं ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी ‘नाट्यवेड्या’ रसिकांना खडे बोल सुनावले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या रंगभूमीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पालेकर यांच्या हस्ते त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी अभिनेत्री वंदना गुप्ते, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा देशपांडे, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पदाधिकारी सत्यशील धांडेकर, समीर हंपी व दीपक गुप्ते उपस्थित होते. ‘सखाराम बार्इंडर’च्या वादग्रस्त अध्यायाचा आजच्या काळाशी धागा पकडत पालेकर म्हणाले, या नाटकातील चंपा (लालन सारंग) आणि सखाराम (निळू फुले) यांनी रंगभूमीवर अनेक अर्थाने वस्तुपाठ घालून दिला. तो जतन करून ठेवला पाहिजे, मात्र सुदैवाने असे होताना दिसत नाही. नाटकाचा हा इतिहास केवळ रंगभूमीपुरता मर्यादित न राहता तो सांस्कृतिक इतिहास म्हणून जतन केला जायला हवा, तसे झाले नाही तर तो इतिहास काळाच्या ओघात विरून जाईल आणि त्यातून हे मान्य नाही मग पुतळे तोडा-फोडा असे नको ते गुंडगिरीचे धाडस निर्माण होईल, जे आज झाले आहे. हा ठेवा जतन केला तर त्यांना हा आपल्या अस्मितेचा भाग आहे याचे भान येईल. या वेळी मराठी प्रेक्षकांवरही पालेकर यांनी शरसंधान साधले, नाट्यसंस्कृतीवर हल्ला केला जातो तेव्हा त्याचा निषेध हा चार ते पाच कलाकार इतक्यापुरताच मर्यादित असतो, अशा वेळी हा ‘नाट्यवेडा’ बिरुद लावलेला मराठी प्रेक्षक कुठे जातो? राम गणेश गडकरी यांचा अपमान सहन होत असेल तर सांस्कृतिक वेडा प्रेक्षक असे म्हणायचे का? ज्या वेळी मराठी प्रेक्षक कलाकारांच्या पाठीशी उभे राहातील तर तीच लालन सारंग यांना मानवंदना ठरेल.वंदना गुप्ते म्हणाल्या, कुठल्याही परिस्थितीला सामोरी जाणारी लालन सारंग ही रंगभूमीवरची झाशीची राणी आहे. त्यांच्याकडून आत्मविश्वास, निडरपणा, बेडरपणा घेण्यासारखा आहे. सध्या जे काही घडतंय त्या पार्श्वभूमीवर तर हे आवश्यकच आहे. मराठीचे शेक्सपियर समजले जाणारे राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडला गेला, अशा प्रकारच्या घटना, समाजाची सेन्सॉरशिप या घटना निषेधार्हच आहेत. पुरस्कारानंतर अजित भुरे यांनी लालन सारंग यांच्याशी संवाद साधत त्यांचा रंगमंचीय प्रवास उलगडला.